शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहरात दोन ठिकाणी होणार ‘कंटेन्मेंट झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वर्धा जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मागील १० दिवसांत तब्बल दोन वेळा ३६ तासांची संचारबंदी लागू केली. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात दररोज १०० पेक्षा जास्तच नवीन कोविड बाधित सापडत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन कठोर भूमिकेच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाय-योजनांचे पालन करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २७ हॉटस्पॅाट असून, त्यापैकी सर्वाधिक हॉटस्पॅाट वर्धा तालुक्यात आहेत. याच हॉटस्पॅाटमधून वर्धा शहर व परिसरातील इतर भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होऊ नये म्हणून सर्वाधिक कोविडबाधित असलेल्या किमान दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वर्धा जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मागील १० दिवसांत तब्बल दोन वेळा ३६ तासांची संचारबंदी लागू केली. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात दररोज १०० पेक्षा जास्तच नवीन कोविड बाधित सापडत आहेत. गृहअलगीकरणात असलेले कोविड बाधित गृहअलगीकरणाचे नियम न पाळत असल्याने  तसेच बहुतांश नागरिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करीत असल्यानेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासह इतर व्यक्तींना निरोगी ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेत जास्त रुग्ण आढळत असलेल्या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो परिसर सील करण्याचे जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. त्यासाठीची प्रक्रिया सध्या केली जात आहे. 

वर्धा विभागात सध्या कोरोनाचे १२ हॉटस्पॅाट आहेत. त्यापैकी सात हॉटस्पॅाट एकट्या वर्धा शहरात आहेत. याच सात हॉटस्पॅाटपैकी दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्याचे विचाराधीन असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मंगळवारी यावर निर्णय घेण्यात येणार आहे.- सुरेश बगळे, उपविभागीय न्याय दंडाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या