शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

३७३ शेतकऱ्यांनी नोंदविल्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

खरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण  झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे  यांनी दिली.

ठळक मुद्देपीक विमा योजना : २७,६६७ शेतकर्यांनी उतरविला विमा

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि  विविध रोगांच्या आक्रमणा पिकांचे जिल्ह्यात दरवर्षी मोठे नुकसान होते. पीक नुकसानीच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे, पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत  आतापावेतो जिल्ह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पीक विमा भरला. मात्र पीक विमा भरूनही बहुतांशवेळी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाते.  यात शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा खरीप हंगामात अतिपाऊस आणि विविध रोगांच्या आक्रमणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनचे पीक पिवळे पडले तर कपाशीचीही बोंडे सडली. ७२ तासांत नुकसान झालेल्या ३७३ शेतकर्यांनी कृषी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या.  

पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यातखरीप हंगामात नुकसान झालेल्या १ लाख १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण  झाले आहेत. कापूस पिकांचे पंचनामे सुरू आहेत. महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे केले जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच नुकसानीचे क्षेत्र कळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे  यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना पीक नुकसानीपोटी मिळणार्या आर्थिक मदतीकरिता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

१,१५००० हेक्टरवरील पिकांचे झालेत पंचनामेखरीप हंगामात अतिपाऊस, विविध रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेकांना सोयाबीनचा एकरी एक  ते दोन पोती उतारा आला. तर कपाशी पिकाचीही अशीच अवस्था झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या पंचनामे केले. १ लाख १५ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून  कपाशीचे पंचनामे सुरू आहेत.

पिकांना संरक्षण मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते. जिलह्यातील २७ हजार ६६७ शेतकर्यांनी पिकांचा विमा उतरविला असून ४ कोटी ९२ लाख ६९ हजार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पीक विमा उतरवूनही लाभ मिळाला नसल्यास शेतकर्यांनी तक्रार करावी. उपाययाेजना केल्या जाईल.          -विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती