शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: December 22, 2016 00:29 IST

तालुक्यातील वाबगाव येथील शेतकऱ्याला अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी तलाठी भीमराव भेंडे यांनी ५०० रुपयांची लाच मागितली.

५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक देवळी : तालुक्यातील वाबगाव येथील शेतकऱ्याला अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी तलाठी भीमराव भेंडे यांनी ५०० रुपयांची लाच मागितली. याबाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तलाठी भेंडे याला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वाबगाव येथील एका शेतकऱ्याची शेतजमीन गणेशपूर लघु कालव्यासाठी पाटबंधारे विभागाने संपादीत केली. संपादीत खरेदी विवरणपत्राप्रमाणे शेत कोरडवाहू दाखविण्यात आले होते; पण सदर शेत ओलिताचे असल्याने योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्याने विशेष भूसंपादन अधिकारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ वर्धा यांच्याकडे अर्ज केला. यानंतर सदर प्रकरण मंडळ अधिकारी व वाबगावचे तलाठी यांनी पाहणी करीत प्रकरण तयार केले. ते तहसील कार्यालयाचे तलाठी भेंडे यांच्याकडे दिले. शेतकऱ्याने भेंडे यांची भेट घेतली असता त्वरित कार्यवाहीसाठी त्याने ५०० रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीला माहिती दिली. यावरून बुधवारी सापळा रचून तलाठी भेंडे याला ५०० रुपये घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, रामजी ठाकूर, खल्लारकर आदींनी केली.(प्रतिनिधी)