राज्यसरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:13+5:30

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवारी तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.

BJP's Elgar against the state government | राज्यसरकारविरोधात भाजपचा एल्गार

राज्यसरकारविरोधात भाजपचा एल्गार

Next
ठळक मुद्देअपयशाचा वाचला पाढा : ठिकठिकाणी तहसीलदारांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवारी तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.
सेलूत धरणे
सेलू : सेलू येथे तहसील कार्यालयासमोर भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती अशोक मुडे, माजी सभापती जयश्री खोडे, शहर अध्यक्ष शब्बीर सय्यद, जिल्हा परिषदेच्या सदस्य सोनाली कलोडे, विनोद लाखे, नगर पंचायतीचे माजी उपाध्यक्ष चुडामण हांडे, मनोहर सोमनाथे, विलास वरटकर, वसंता भादंककर, संजय अवचट, सरपंच माला नरताम, राजू झाडे, विकास मोटमवार, विजय खोडे, जावेद सय्यद, भगवान तिवारी, विवेक धोटे, संजय कोटंबकर, सुनील चापडे, उकेश चंदनखेडे, गजानन उईके, फिरोज शेख, मनोज धाबर्डे, सरपंच सागर भगत, फुलचंद चव्हाण, अर्चना लोणकर, अभय ढोकणे, संगीता तोतडे शुभांगी मुडे, लीना तिवारी, संकेत बारई, उपसरपंच प्रवीण तुमाने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांना सादर करण्यात आले.

माजी खासदारांच्या उपस्थितीत आर्वीत धरणे
आर्वी : येथे तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. या आंदोलनाला माजी खासदार विजय मुडे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, विजय बाजपेयी, अनिल जोशी, हनुमंत चरडे, प्रशांत वानखेडे, जगन गाठे, राजाभाऊ वानखेडे, राजाभाऊ हिवसे, अशोक निकम, राजू राठी, राजू कदम, अतुल खोडे, जितू ठाकरे, धमेंद्र राऊत, दिनेश डेहनकर, देविदास शिरपूरकर, भारती देशमुख, उषा सोनटक्के, संगीता डोंगरे यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.
सिंदी (रेल्वे) येथे धरणे आंदोलन
सिंदी (रेल्वे) : येथेही भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. महादेव मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत जाऊन धरणे देण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण सिर्सीकर, सुधाकर घवघवे, अरुण ढेंगरे, प्रभाकर काळबांडे, दिलीप डकरे, जयंत बडवाईक, ओमप्रकाश राठी, विनायक झिलपे, संजय तडस, गुल्लू भन्साली, संजय ईटनकर, गिरधर सोनटक्के, पुष्पा सोनटक्के, कोकिळा शेटे, अकील शेख, स्नेहल कलोडे, महादेव बोरकर, प्रकाश सिरसे, नरेंद्र सेलुकर, नीतेश चव्हाण, रवी मुंदडा, बबलू गवईकर, संग्राम कळणे, प्रशांत बोरीकर उपस्थित होते. नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

खासदार, जि.प. उपाध्यक्षांच्या उपस्थितीत धरणे
देवळी : येथे तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. यावेळी खा.रामदास तडस, माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जि.प.उपाध्यक्ष वैशाली येरावार, नगराध्यक्ष सुचिता मडावी, गटनेत्या शोभा तडस, माजी जि. प. सभापती मुकेश भिसे, पं.स.सभापती कुसुम चौधरी, उपसभापती युवराज खडकर, न.प. उपाध्यक्ष प्रा.नरेंद्र मदनकर उपस्थित होते. आंदोलनात जयंत येरावार, विद्या भुजाडे, किशोर गव्हाणकर, जि.प.सदस्य मयुरी मसराम, विक्रम वैद्य, दुर्गा मडावी, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, संगीता तराळे, मारोती मरघाडे, नंदू वैद्य, जि.प.सदस्य प्रवीण सावरकर आदींचा सहभाग होता. संचालन तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे यांनी केले. आभार शहर अध्यक्ष रवी कारोटकर यांनी केले. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट येथे तहसीलसमोर धरणे
हिंगणघाट : तहसीलसमोरील आंदोलनात भाजप नेते किशोर दिघे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, आकाश पोहाणे, रिपाइंचे शंकर मुंजेवार, आशीष पर्बत, माजी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, वामन खोडे, राजू गंधारे, गंगाधर कोल्हे, माधव चन्दनखेड़े, प्रफुल्ल बाडे, डॉ. विजय पर्बत, बिस्मिलाखाँ, नगरसेवक डॉ. उमेश तुळस्कर, छाया सातपुते, अनिता माळवे, शुभांगी डोंगरे, वंदना कामडी, वैशाली सुरकार, अंकित ढगे, नीता धोबे उपस्थित होते. संचालन राकेश शर्मा यांनी केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार झिले यांना निवेदन देण्यात आले.

कारंजा (घा.) येथे धरणे
कारंजा (घाडगे) : जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, माजी सभापती नीता गजाम, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप जसुतकर, पं.स.उपसभापती जगदीश डोळे, माजी सभापती मंगेश खवशी, हेमंत बन्नगरे, युवराज गिºहाळे, दादाराव दुपारे, रेवता थोटे, वंदना टिपले, पुष्पा चरडे, आम्रपाली बागडे, नगरसेवक शेख निसार, नीता काकडे, उषा घागरे, रमेश लोहकरे, किशोर ढोले, संदीप चोपडे, किशोर भांगे, विजय गाखरे, चक्रधर डोंगरे, सुदीप भांगे, चंदू जसुतकर, सुनील इंगळे, प्रफुल्ल भिसे, शिवम कुरडा, शैलेश घिमे, मोहन चौधरी, हरिभाऊ चौधरी, सुनील वंजारी, निखिल धंडारे, राहुल भांगे, वसंता भांगे, गोपाल वसुले, संजय बंनगरे, विजय काशीकर, नीलेश देशमुख, गजानन सरोदे, महेश भांगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: BJP's Elgar against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.