शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या आधुनिक संकल्पनेसाठी प्रयत्न गरजेचे

By admin | Updated: July 31, 2014 00:11 IST

विकासाची आधुनिक संकल्पना जनजातीच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे़ माहितीच्या विस्फोटाचा लाभ अशा भागाला मिळण्यासाठी तेथे माहिती़,

वर्धा : विकासाची आधुनिक संकल्पना जनजातीच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे़ माहितीच्या विस्फोटाचा लाभ अशा भागाला मिळण्यासाठी तेथे माहिती़, संचार आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा़ देवराज यांनी केले़ संचार व मीडिया अध्ययन केंद्राच्यावतीने ‘शिक्षणात माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रयोग’ या विषयावर शिक्षकांकरिता २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले़ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ कार्यशाळेला मुख्य वक्ते म्हणून वरिष्ठ शिक्षण प्रशिक्षक नवेन्दु महोदय इंदोर, भारतीय जनसंचार संस्था नवी दिल्लीचे माजी अभ्यासक्रम निदेशक प्रा़ प्रदीप माथूर, वरिष्ठ दृक-श्राव्य संचालक डॉ़ किशोर वासवानी अहमदाबाद, मानविकी तसेच सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे प्रा़ अनिलकुमार राय आदी उपस्थित होते़यावेळी डॉ़ वासवानी म्हणाले की, अध्यापनात संचारच्या विविध साधनांचा उपयोग केला पाहिजे़ विविध हिंदी चॅनल व धारावाहिकांचा उल्लेख करून ते म्हणाले की, हिंदीचे मार्केट तीव्र गतीने वाढत आहे आणि यातून वर्षाकाठी दोन हजार कोटी रुपये प्राप्त होत आहेत़ प्रा़ प्रदीप माथूर यांनी देशात मिडीयाचा बोलबाला असला तरी अद्यापही ५० टक्के लोकसंख्या मिडीयापासून दूरच आहे़ राज्याच्या सीमा विस्तारायला हे ज्ञान माहिती, संचार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविले पाहिजे, असे सांगितले़ याप्रसंगी नवेन्दु महोदय यांनीही विचार व्यक्त केले़ मान्यवरांचा सत्कार प्रा़ अनिलकुमार राय यांनी केला़ कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रा़डॉ़ रेणू सिंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक प्रा़ राजेश लेहकपुरे यांनी मानले़ या कार्यशाळेत अध्यापकांना इंटरेक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, पॉवरपार्इंट प्रस्तुती, स्पेलिंग ट्यूटर सॉफ्टवेअर, ग्राफिक्स सॉफ्टवेअर, फोटो सॉफ्टवेअर, डाटा स्टोरेज मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आदी अत्याधुनिक तंत्राबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे़ महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या संचार व मीडिया अध्ययन केंद्राद्वारे आयोजित केलेल्या या कार्याशाळेत प्राध्यापकांना नवीन ज्ञान मिळत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)