आर्वी तालुका उद्दिष्टापासून लांबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:10+5:30

मार्च महिना सुरु झाला असून या महिन्याभरात १ हजार ७९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. या दिवसात ते होईल की नाही, ही शंकाच आहे. त्यामुळे या तालुक्यात घर तिथे शौचालयाचा फज्जाच उडाला आहे. शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले असून याकरिता १२ हजार रूपये प्रत्येक शौचालयावर शासन खर्च करीत आहे.

Arvi taluka is far from the goal | आर्वी तालुका उद्दिष्टापासून लांबच

आर्वी तालुका उद्दिष्टापासून लांबच

ठळक मुद्देकेवळ ४२५ शौचालयांचेच बांधकाम

पुरुषोत्तम नागपूरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शासनाने अनुदान तत्त्वावर प्रत्येक घरी शौचालय देण्याची योजना आखली आहे. आर्वी तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायती असून या आर्थिक वर्षांत १५०४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना उलटला तरी केवळ ४२५ शौचालय बांधण्यात आले असून तालुका उद्दिष्टांपासून लांबच असल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिना सुरु झाला असून या महिन्याभरात १ हजार ७९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. या दिवसात ते होईल की नाही, ही शंकाच आहे. त्यामुळे या तालुक्यात घर तिथे शौचालयाचा फज्जाच उडाला आहे. शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले असून याकरिता १२ हजार रूपये प्रत्येक शौचालयावर शासन खर्च करीत आहे. ग्रामीण भागात हागणदारी मुक्त योजना राबवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. परंतु शौचालय बांधकाम प्रति ग्रामवासियांची अनास्था आहे.

मानसिकता ठरते अडचणीची
घरात शौचालय बांधून आपण चुकीचे काम करीत आहो. मळ घरात जमा करीत आहो. अशी मानसिकता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. सदर मानसिकता योजनेसाठी अडचणीची ठरत आहे.

आर्वी तालुक्यात ४२५ शौचालयची कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित १ हजार ७९ शौचालयाचे बांधकाम मार्च महिन्यात पूर्ण करण्याचा मानस आहे. तालुक्यातून शौचालयाकरिता १ हजार ५०४ अर्ज प्राप्त झाले आहे.
-नरेश माने, विस्तार अधिकारी पंचायत .

 

Web Title: Arvi taluka is far from the goal