शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना चार महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा

By admin | Updated: October 21, 2014 22:57 IST

प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबिज भेटही अद्याप मिळाली नाही.

सेलू : प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबिज भेटही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अतिशय अल्प मानधन मिळत असून जून २०१४ पासून मानधनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. काही कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा अर्धा पगार मिळाला तर काहींना पूर्ण पगार देण्यात आला आहे. अंगणवाडीमध्ये कार्यरत सेविका व मदतनीस ह्या बहुतांश गरजवंत असताना त्यांना चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसत आहे. वेतनवाढीसाठी तसेच वेळेवर वेतन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा जिल्हा व राज्यस्तरावर आंदोलने केली. परंतु प्रत्येक वेळी आश्र्वासनच देण्यात आले. गावातील कुपोषण नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर योजना आखण्यात येते व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी गावस्तरावर अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधन वाढ करावी, या मागण्या प्रलंबित आहे. वेतन वेळेवर होईल, असे शासनाकडून आश्र्वासन देण्यात आले परंतु चार महिन्यांपासून निधीअभावी मानधन अडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या नसून त्यांचे काम थंडबस्त्यात आहे. अंगणवाडी सेविकांचे चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने त्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी प्रतिक्रिया सेविका आणि मदतनिसांमधून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)