शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आनंद निकेतनच्या शिक्षकांनी केली शेतात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्पादन, व्यवहार, अर्थकारण यासोबतच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमही शिकविला जातो.

ठळक मुद्देसेवाग्रामात कृतीयुक्त शिक्षण : विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित होतेय शिवणकाम, शेतीकाम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : चार भिंतीच्या आत विद्यार्थ्यांचे विश्व बंदिस्त न करता निसर्गाच्या सानिध्यात कृतीयुक्त शिक्षण देण्याचे कार्य सेवाग्राम येथील आनंद निकेतन विद्यालयात अविरत सुरु आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेत पोहोचू न शकल्याने शिक्षकांनीच शाळेत उपस्थित राहून त्यांच्या शेतामध्ये लावणी व पेरणीची कामे आटोपली आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्पादन, व्यवहार, अर्थकारण यासोबतच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमही शिकविला जातो. कृतीशिल शिक्षण पद्धतीचा अवलंब करणाऱ्या या विद्यालयात लॉकडाऊनमुळे यावर्षी विद्यार्थी येऊ न शकल्याने शिक्षकवृंद शेतात लावणी, पेरणी आणि मास्क बनविण्याचे काम करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक लावणी, पेरणीची कामे विद्यार्थ्यांविना शिक्षकवृंदानीच केली. त्यांनी कापूस, तूर, वेलवर्गीय भाजीपाला आदींची लावणी केली.शेतीशिक्षण हा नयी तालिम शिक्षण प्रणालीचा एक भाग आहे. येथे शेती कामातून अनेक विषय शिकविल्या जातात. सध्या विद्यार्थी नसल्याने शेतीची कामे थांबविता येत नाही. तसेच मास्कचीही गरज असल्याने त्यावर भर देण्यात आला. शिक्षकांनाही सृजनात्मकतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शिक्षकवृंदानीच विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत कामे सुरु केली आहे.- सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम.

टॅग्स :agricultureशेतीTeacherशिक्षक