शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

न्यायशीर मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन

By admin | Updated: February 12, 2015 01:36 IST

वर्धा नगरपालिका अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांच्या प्रमुख दहा मागण्या आहेत. या मागण्यांची अद्याप पूर्तता न झाल्याने कामगारांनी आंदोलन केले.

वर्धा : वर्धा नगरपालिका अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांच्या प्रमुख दहा मागण्या आहेत. या मागण्यांची अद्याप पूर्तता न झाल्याने कामगारांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हा पेच सोडविण्याबाबत लोकप्रतिनिधींनी वाटाघाटी केल्या. तसे पत्र प्रशासनाला देण्यात आल्याने कामगारांनी आंदोलन स्थगित केले. पण कार्यवाहीसाठी पालिका प्रशासनाला महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत सफाई कामगारांच्या न्यायशीर १० सूत्रीय मागण्यांची पूर्तता न झाल्यास अनिश्चित काळासाठी कामबंद आंदोलन करणार येणार आहे. याकरिता पीडित सफाई कामगारांनी जिल्हा व पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.येथील पालिकेत कार्यरत सफाई कामगारांच्या १० सूत्रीय न्यायिक मागण्यांची अनेक वर्षांपासून पूर्तता झालेली नाही. म्हणून कामगारांनी नगर परिषद कार्यालयासमोर ४ फेब्रुवारी पासून अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन सुरू केले होते. सफाई कामगार संघटना, वर्धा जिल्हा यांचा यात सहभाग होता. आमदार पंकज भोयर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सफाई कामगार प्रतिनिधींशी चर्चा केली. शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. तसे पत्र संबंधित प्रशासनाल दिले. यानंतर कामगारांनी तात्पुरते मागे घेऊन पालिका प्रशासनाला अंमलबजावणीकरिता महिनाभराची मुदत दिली.प्रमुख १० मागण्यांत सफाई कामगारांच्या २०० नवीन पदांची भरती करण्याचा प्रस्ताव आयुक्त व संचालक नगर पालिका प्रशासन, मुंबई यांच्याकडे प्रलंबित आहे. त्या प्रस्तावला मंजुरी मिळवून देण्याकरिता कार्यवाही करावी, १ मार्च २०१५ पासून सफाई कामगारांच्या कामावर येण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता पर्यंत करण्यात यावी, याचा उल्लेख आहे. सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करून पूर्तता करण्याचे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे. मागण्यांची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्यास कामगारांकडून पुन्हा कार्यवाही करण्यात येईल, यामुळे नागरिकांना होणारी असुविधाची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा दिला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)