शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी लागणार 97 हजार 40 क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

सन २०२१-२२ खरीप हंगामात ४ लाख ३० हजार ५० हेक्टरपैकी २ लाख २७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, १ लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, ७३ हजार ५५० हेक्टरवर तूर, २ हजार १५ हेक्टरवर ज्वारी, १ हजार ८३५ हेक्टरवर मका, ७१० हेक्टरवर उडीद, ४८५ हेक्टरवर मूग तसेच ६७५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून सोयाबीन, तूर तसेच कपाशीचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.

ठळक मुद्देआवक झाली सुरू : ४ लाख ३० हजार ५० हेक्टरवर होणार लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ४ लाख ३० हजार ५० हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची लागवड होणार असून त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सध्या बियाण्यांची आवक सुरू झाली असून शेतकरीही उन्हाळवाहीसह बियाणे खरेदीसाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुवळ करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सन २०२१-२२ खरीप हंगामात ४ लाख ३० हजार ५० हेक्टरपैकी २ लाख २७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, १ लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, ७३ हजार ५५० हेक्टरवर तूर, २ हजार १५ हेक्टरवर ज्वारी, १ हजार ८३५ हेक्टरवर मका, ७१० हेक्टरवर उडीद, ४८५ हेक्टरवर मूग तसेच ६७५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून सोयाबीन, तूर तसेच कपाशीचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. तर उर्वरित बियाणे वेळीच वर्धा जिल्ह्यात कसे दाखल होईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यंदा कुठल्याही परिस्थितीत बियाण्यांची टंचाई होणार नाही असे नियोजन करण्यात आले असले तरी ३० मे रोजी संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मध्यप्रदेशातील सोयाबीन बियाणे येणार वर्धेत- मागील वर्षी मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्राला बियाणे देण्यावर बंदी घातली होती. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र शासनाने राज्याला बियाणे मिळावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर सध्या महाराष्ट्राला  सोयाबीन बियाणे देण्यास मध्यप्रदेश शासनाने होकार दर्शविला आहे. त्यामुळे यंदा वर्धा जिल्ह्यात मध्यप्रदेशातील सोयाबीन बियाणे दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

कठोर निर्बंधांमुळे कृषी केंद्र आहेत बंद- झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरी व ग्रामीण भागातील कृषी केंद्र बंद आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील कृषी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये या हेतूने   सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत जिल्ह्यातील कृषी केंद्र सुरू, अशी मागणी कृषी केंद्र व्यावसायिकांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

३० मे रोजी होणार चित्र स्पष्ट- खरीप हंगामात कुठल्याही परिस्थिती जिल्ह्यात बियाणे टंचाई निर्माण होऊन नये, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. असे असले तरी ३० मे रोजी वर्धा जिल्ह्यात आणखी बियाण्यांची गरज पडेल काय, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती