शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी बाजार समितीकरिता ३९ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 19, 2015 02:17 IST

सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होवू घातलेल्या निवडणुकीत १८ पैकी दोन जागा अविरोध ठरल्या आहेत.

दोन जागा अविरोध : ९१ जणांनी दाखल केले होते नामांकनसेलू : सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होवू घातलेल्या निवडणुकीत १८ पैकी दोन जागा अविरोध ठरल्या आहेत. उर्वरित १६ जागेसाठी निवडणूक होत आहे. याकरिता एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. निवडणुकीसाठी १०१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अर्जाच्या छाननीच्या वेळी दहा उमेदवाराचे अर्ज रद्द झाले. उर्वरीत ९१ उमेदवारापैकी गुरुवारी ५० उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. यात अडते व्यापारी गटातील दोन जागेसाठी दोनच अर्ज राहिल्याने सहकार गटाचे संजय तडस व बबन हिंगणेकर हे अविरोध निवडून आले. उर्वरीत १६ जागेसाठी ही निवडणूक होत आहे. याकरिता ३९ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहे. सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण सात जागेसाठी १६, महिला प्रवर्गातून दोन जागेकरिता चार, इतर मासवर्गीय एका जागेसाठी दोन, अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन, ग्रामपंचायत गटात सर्वसाधारण दोन जागेसाठी सात, अनु-जाती जमाती एका जागेकरिता दोन, आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहे. हमाल मापारी गटात एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.या निवडणुकीत सत्तारुढ सहकार गटाला शह देण्यासाठी भाजपाने आपले उमेदवार निवडणूक रणांगणात उतरविल्याने ही सरळ लढत होणार आहे. सेवा सहकारी संस्था गटातील सर्वसाधारण सात जागेसाठी १६ उमेदवार आहे. तर ग्रामपंचायत गटात सर्वसाधारण वर्गात दोन जागेसाठी सात उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन गटात होणारी सरळ लढतीमुळे मतविभाजन होणार असल्याने चुरस वाढली आहे. हमाल व्यापारी गटात एका जागेसाठी चार उमेदवार असल्याने येथे चौरंगी लढतीचे संकेत आहेत. नेत्यांचे मनोमिलन झाल्यानंतर दोन गट आमने सामने आल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापत आहे. या निवडणूक काळात दोनही गटाला मतदार कितपत साथ देतात यावरच निकाल अवलबंून असला आहे. (तालुका प्रतिनिधी)