शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देसरासरी १५.३१ मिमी पाऊस : वर्ध्यात सर्वाधिक बरसला, उभ्या पिकांना नवसंजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत वर्धा जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सर्वाधित पाऊस वर्धा तालुक्यात झाला असून जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सरासरी १५.३१ इतकी आहे.मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना होती. अशातच शनिवारी रात्री जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. वर्धा तालुक्यात ३४.३५ मिमी, सेलू ३०.२० मिमी, देवळी ११.१६ मिमी, आर्वी ५.३३ मिमी, आष्टी (शहीद) ६.०० मिमी, कारंजा (घा.) १३.२५ मिमी, हिंगणघाट १५.१० मिमी तर समुद्रपूर तालुक्यात ७.१५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मुसळधार पावसादरम्यान पावसाचे पाणी वर्धा शहरासह सिंदी (मेघे) येथील काही नागरिकांच्या घरात शिरले.मुसळधार पावसामुळे घर कोसळलेवर्धा : शहरातील सानेगुरूजी आर्वी नाका येथील मयुर चंद्रकांत सलामे यांचे घर शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाले. घरातील जीवनावश्यक वस्तूंची यात नासाडी झाल्याने त्यांचे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. सर्वेक्षण करून तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांना तालुका प्रशासनाकडे केली आहे.शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. याच पावसादरम्यान रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढणाºया मयुर सलामे यांचे टिनाचे घर जमिनदोस्त झाले. शिवाय पावसाच्या पाण्याने घरातील फ्रिज, टिव्ही, कुलर, सिलिंग फॅन, टेबल फॅन, मिक्सर, टेलरिंगची मशीन, प्रेस, ट्युब लाईट, सेटॉपबॉक्स हे विद्युत उपकरणे भिजल्याने ते निकामी झाले. शिवाय घरातील धान्य व इतर जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झोलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीतून मयुर सलामे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस