शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्हा बँकेला अखेर १0२ कोटींची मदत

By admin | Updated: June 6, 2014 00:08 IST

मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने वर्धा जिल्हा बँकेला १0२ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल,

वर्धा : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने वर्धा जिल्हा बँकेला १0२ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल, शिवाय  सीआरएआर ४ टक्क्यांवर गेल्याने बँकेला रिझर्व्ह बँकेचा आर्थिक परवाना मिळण्यास काहीच अडचणी येणार नाही.शासनाने घोषित केलेल्या ३१९ कोटींपैकी नागपूर जिल्हा बँकेला ९३ आणि बुलडाणा बँकेला १२४ कोटींची मदत भागभांडवल स्वरुपात राहील. याआधी शासनाने अशा प्रकारची मदत धुळे नंदूरबार बँकेला केली होती. याआधी नागपूर जिल्हा बँकेचे नेटवर्थ ७७.४१ कोटींनी निगेटिव्ह होते. शासनाच्या ९३ कोटींच्या मदतीने हे नेटवर्थ १५.५९ कोटींनी पॉझिटिव्ह होईल. याशिवाय ९.९८ टक्के असलेला सीआरएआर नेटवर्थ पॉझिटिव्ह झाल्याने ३१.१८ कोटींवर जाईल. तो ४ टक्क्यांपेक्षा (३१.१८ कोटी) जास्त असेल. हीच बाब वर्धा जिल्हा बँकेच्या बाबतीतही घडणार आहे. वर्धा बँकेचे नेटवर्थ ९३.७३ कोटींनी निगेटीव्ह होते. ते आता १0३.0८ कोटींनी पॉझिटीव्ह होईल. यामुळे ४ टक्के पर्याप्त भागभांडवलाची गरज पूर्ण  होणार असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सर्व अटींची पूर्तता होईल. शिवाय बँकेचे व्यवहार लवकरच नियमित होतील. दोन वर्षांपासून जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असल्यामुळे सुमारे अडीच लाख खातेदारांची आर्थिक कोंडी झालेली होती.  थकित वसुली करण्यावर बंधणे आली होती. यामुळे आता आपल्या रकमा मिळणार नाही, अशी भिती खातेदारांमध्ये निर्माण झाली होती. इतकेच नव्हे, तर राजकीय डावपेचाचा भाग म्हणून ही भिती शेतकर्‍यांसह संपूर्ण खातेदारांमध्ये निर्माण करण्याचे कामही या काळात मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. अखेर शासनाने उशिरा को होईल. विदर्भातील तिन्ही बँकांना भाग भांडवल देऊन विरोधकांची तोंडे बंद केली आहे.  यामुळे खातेदारांचा मोठा दिलासा मिळाला आहे.  बँकेचे माजी अध्यक्ष समीर देशमुख यांनीही या बाबीला दुजोरा दिला.(जिल्हा प्रतिनिधी)