शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:54 IST

Uttar Pradesh Crime News: सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बापानेच पोटच्या पोराची डोक्यात फावड्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे घडली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. 

सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बापानेच पोटच्या पोराची डोक्यात फावड्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे घडली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील नांगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ नोव्हेंबर रोजी उसाच्या शेतामध्ये सौरभ तोमर नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या स्थितीवरून हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. दरम्यान, मृत सौरभ याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीमध्ये तिने सौरभचे वडील सुभाष तोमर यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपास आणि ग्रामस्थांनी दिलेल्या जबाबांमधून पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुभाष तोमर याला अटक केली. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार हत्येसाठी वापरलेलं फावडं आणि एक बेकायदेशीर कट्टा जप्त केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सुभाष याने धक्कादायक कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याचे त्याच्या सुनेसोबत अनैतिक संबंध होते. तसेच मृत सौरभ याला याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. 

दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी सौरभ शेतात काम करत असताना सुभाष याने त्याला उसाच्या शेतात बोलावून घेतले. तसेच कट्ट्यामधून त्याच्यावर गोळीबार केला. मात्र सौरभ त्यात बचावला. मात्र सुभाष याने संधी साधून बाजूला असलेल्या फावड्याने सौरभच्या डोक्यात जोरात वार केले. त्यात सौरभचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुभाष याने सौरभ हा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आणि त्याचा शोध घेत असल्याचं नाटक रचलं. मात्र हे नाटक फार काळ टिकलं नाही. पोलिसांसमोर अखेर त्याचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी