शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:48 IST

Uttar Pradesh Murder: अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या एकुलत्या एक मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथून धक्कादायक माहिती समोर आली. अवैध संबंधांमध्ये अडथळा आणि पैशाच्या लालसेतून एका आईने तिच्या प्रियकरसोबत मिळून एकुलत्या एक मुलाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आईसह तिच्या प्रियकराला अटक केली.  

मिळालेल्या माहितीनुसार, ममता नावाच्या एका महिलेचे पती संदीप कुमार यांच्या मृत्युनंतर गावातील मयंक कटियार या नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. तर, ममताचा मुलगा प्रदीप हा आंध्र प्रदेशात कामाला होता आणि दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी परतला. गावकऱ्यांकडून आईच्या अवैध प्रेमसंबंधांबद्दल कळताच प्रदीपने या नात्याला तीव्र विरोध केला. ममता आणि मयंक त्यांच्या अवैध संबंधांतील हा अडथळा दूर करण्यासाठी प्रदीपच्या हत्येचा कट रचला.

प्रदीपच्या हत्येच्या काही दिवस आधी, ममता आणि मयंक यांनी प्रदीपच्या नावाने ४० लाख रुपयांच्या चार विमा पॉलिसी काढल्या. प्रदीपचा मृत्यू अपघात म्हणून दाखवल्यास मोठे पैसे मिळतील, अशी त्यांची योजना होती. मयंकने त्याचा धाकटा भाऊ ऋषी कटियारला या गुन्ह्यात सहभागी करून घेतले. घटनेच्या दिवशी, ऋषीने प्रदीपला एका हॉटेलमध्ये जेवायला नेले आणि वाटेतच त्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह मृतदेह कानपूर-इटावा महामार्गावरील डेरापूर पोलिस ठाणे परिसरात फेकून दिला.

दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी प्रदीपचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अपघाताचा संशय व्यक्त केला. मात्र, मृताचे आजोबा जगदीश नारायण यांनी थेट पोलिसांकडे जाऊन ममता आणि मयंक यांच्या अवैध प्रेमसंबंधांबद्दल सांगितले. गावकऱ्यांनीही पोलीस ठाण्यात जमाव केल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. तपास सुरू असतानाच, अंगदपूरजवळ पोलिसांनी आरोपी ऋषी कटियारला घेराव घातला. त्यावेळी ऋषीने पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ऋषीच्या पायाला गोळी लागली आणि त्याला अटक करण्यात आले. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

अतिरिक्त एसपी राजेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर मयंक कटियारलाही बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली असून, हत्येमध्ये वापरलेला हातोडा जप्त करण्यात आला. अवैध प्रेमसंबंध लपवण्यासाठी आणि विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आईने प्रियकरासोबत मिळून मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी ऋषी कटियारवर यापूर्वीही दरोडा, चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother kills son for insurance money, lover involved in crime.

Web Summary : A mother in Uttar Pradesh, along with her lover, murdered her son to claim insurance money. The son objected to their affair. Police arrested both the mother and her lover. They planned the murder to get ₹40 lakh from insurance policies.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश