शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

"दोन्ही 'शहजाद्यां'ना आजपर्यंत चावी सापडेना...", PM मोदींनी थेट सुनावलं; एक राहुल गांधी, दुसरं कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 4:44 PM

विकसित भारताची चावी देखील आपल्याकडेच आहे. आता देशाला गरिबी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून पूर्णपणे मुक्त करायची वेळ आली आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मी गेल्या वेळी जेव्हा अलिगडमध्ये आलो होतो, तेव्हा सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या कारखान्याला टाळे ठोका, अशी विनंती आपल्या सर्वांकडे केली होती. आपण एवढे मजबूत टाळे ठोकले की, दोन्ही राजकुमारांना (शहजादा) आजपर्यंत याची चावी सापडेना. विकसित भारताची चावी देखील आपल्याकडेच आहे. आता देशाला गरिबी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून पूर्णपणे मुक्त करायची वेळ आली आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना निशाण्यावर घेतले.

पीक कापणीची वेळ आहे पण... -मोदी म्हणाले, यावेळी पीक कापणीची वेळ आहे. लग्न समारंभांची वेळ आहे. मात्र देशापेक्षा मोठे काहीच नसते. आपण सर्व कामे बाजूला सारून मतदान करायला हवे. सकाळी-सकाळीच मतदान करणे आवश्यक आहे. उन पडण्यापूर्वी मतदान व्हायला हवे. अल्पोपाहारापूर्वी मतदान व्हायला हवे. आपले प्रत्येक मत महत्वाचे आहे.

पूर्वी शहरांमध्ये बॉम्बस्फोट होत होते -मोदी म्हणाले, पूर्वी सीमेवर रोज गोळीबार व्हायचा. प्रत्येक मोठ्या शहरात बॉम्बस्फोट होत होते. मात्र आता, बॉम्बस्फोटांच्या मालिकेलाही पूर्णविराम लागला आहे. जे पहिल्यांदाच मतदनाद करणार आहेत, त्यांना हे आठवणार नाही. केवळ लक्षात असू द्या, काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांमधून आणि टीव्हीवर एक जाहिरात येत होती की, कुठेही बेवारस वस्तू आढळल्यास तिच्यापासून दूर राहा. तिला स्पर्श करू नका. कुठे पिशवी, कुकर अथवा टिफिन दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका. तत्काळ पोलिसांना कळवा. अशा घोषणा रोज होत होत्या. फर्स्ट टाइम व्होटर्स तेव्हा छोटे होते. तेव्हा बेवारस गोष्टींमध्ये बॉम्ब ठेवले जात होते. मात्र आता सर्व काही थांबले आहे. हा मोदी-योगींचा चमत्कार आहे. जेव्हा शांती असते तेव्हा विकास होतो.

दंगे योगीजींनी बंद केले - मोदी म्हणाले, "दंगली, हत्या, गँगवॉर, खंडणी हे सर्व सपा सरकारचा ट्रेडमार्क होता. हीच त्यांची ओळख होती आणि त्यावरच राजकारण चालत होते. मात्र, योगीजींच्या सरकारमध्ये, नागरिकांची शांतत बिघडवण्याची गुन्हेगारांची हिंमत नाही. एवढेच नाही, तर काँग्रेस आणि सपासारख्या पक्षांनी नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले. मुस्लिमांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काही केले नाही. मी जेव्हा पसमंदा मुस्लिमांच्या दुरवस्थेसंदर्भात बोलतो, तेव्हा त्यांना टेन्शन येते. कारण वरच्या लोकांनी मलई खाल्ली आणि पसमांदा मुस्लिमांना त्यांच्या परिस्थितीवर जगण्यास भाग पाडले, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश