coronavirus : लंडनला जायचं का ? आज -आता -लगेच ?- मग  हे करा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 05:42 PM2020-03-28T17:42:20+5:302020-03-28T17:56:38+5:30

आज करा जगातल्या प्रसिद्ध म्युङिायम्सची ऑनलाइन टूर

Want to go to London? - Today - now? - check out this amazing virtual museum tours | coronavirus : लंडनला जायचं का ? आज -आता -लगेच ?- मग  हे करा.. 

coronavirus : लंडनला जायचं का ? आज -आता -लगेच ?- मग  हे करा.. 

Next
ठळक मुद्दे घरी बसून लंडनला जा!

बाहेर नाही जायचंय हे मान्य; पण घरी बसूनही तुम्ही भटकू शकता. कसं म्हणून काय विचारता? ऑनलाइन!!

तुम्हाला म्युङिायम्स बघायला आवडतात? जुन्या गोष्टी, पूर्वीच्या माणसांनी वापरलेल्या वस्तू, प्राण्यांचे सापळे, डायनोसॉरचे सांगाडे, इजिप्तमधल्या ममीज आणि अचानक सापडलेले खजिने, दुर्मीळ चित्र.. म्युङिायम्स बघणं म्हणजे इतिहास बघणंच असतं. त्या काळात आपण जातो, तेव्हाची माणसं कशी वागत असतील, बोलत असतील, काय काय वापरत असतील, लुप्त झालेल्या प्राण्यांचे अवशेष, फॉसिल्स बापरे. किती भन्नाट असतात ना म्युङिायम्स. आता तुम्ही जगभरातली प्रमुख म्युङिायम्स ऑनलाइन बघू शकता. 

कोरोना व्हायरसमुळे जगात सगळीकडे सोशल डिस्टंसिंग सुरू आहे. म्हणजे, दुकानं, मॉल्स, म्युङिायम्स, बागा असं सगळं सगळं जगभर बंद आहे. तुम्ही जसे घरात आहात ना तशीच जगभर इतरही मुलं घरातच आहेत. तुम्हा मुलांच्या आख्ख्या जगाला कंटाळा आला आहे. मग काहीतरी भन्नाट आयडिया तर लढवली पाहिजे, त्याशिवाय कंटाळा जाणार कसा? म्हणून मग या म्युङिायम्सनी व्हचरुअल टूर्सची सोय केलेली आहे. तुम्हाला घरबसल्या जगप्रसिद्ध म्युङिायम्स बघता येतील.

कसं जायचं म्युङिायम्समध्ये?

1. गुगलवर जा आणि टाइप करा  british museum online tour की लगेच ब्रिटिश म्युङिाअमच्या टूरचं पेज उघडेल

2. याशिवाय आणखी किती म्युङिायम्स आहेत त्यांची ही यादी :

yellowstone national park, the great china wall, van gogh museum, The Museum of Modern Art

3. या म्युङिायमची नावं काळजीपूर्वक टाईप करा आणि प्रत्येकाच्या पुढे लिहा online tour सर्च दिलात की तुम्हाला ही ऑनलाइन टूर करता येईल.

 

Web Title: Want to go to London? - Today - now? - check out this amazing virtual museum tours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.