शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आज सब काम बंद , बोल दो हम आराम करेंगे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:50 IST

म्हणजे काहीच न करणे. थोडक्यात सांगायचं तर रिकामं बसणे.

ठळक मुद्दे  ‘काही न करण्यासाठी’ थोडा वेळ राखून ठेवायला विसरू नका!

लोक करोनाच्या नावाने उगाच आरडाओरडा करतायत. त्यांना वाटतंय की मुलांचा फार अभ्यास बुडाला. पण खरं म्हणजे मार्च एन्ड, शाळेत सगळा अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण झालेलाच असतो. फक्त तुम्हाला यावर्षी परीक्षा द्यायला लागली नाही इतकंच काय ते! पण तरीसुद्धा आईबाबांना वाटतंय की तुम्हाला फार मोठी सुट्टी मिळाली आहे आणि त्या सुट्टीचा प्रत्येक क्षण तुम्ही काहीतरी चांगलं शिकण्यात खर्च केला पाहिजे. शाळांनी तर परीक्षा नाही म्हणून पार  एप्रिल संपेपयर्ंत पालकांना मेसेज पाठवून तुम्हाला घरचा अभ्यास दिला असणार. तुम्हीही तशी शहाणी मुलं असल्यामुळे तुम्हीही आईवडील सांगतात त्या सगळ्या गोष्टी करत असणार. त्या ऍक्टिव्हिटीज करत असणार. पण या सगळ्या गोंधळात मुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेली एक ऍक्टिव्हिटी  पूर्णपणो राहून गेलेली आहे. आणि ती ऍक्टिव्हिटी  इतकी महत्वाची आहे, की ती केली नाही तर तुम्हाला नव्या भारी आयडिया कश्या काय सुचणार?

त्यामुळे तुम्ही आता तातडीने ती ऍक्टिव्हिटी  करायला घ्या आणि शाळा सुरु होईपयर्ंत नेमाने मधून मधून ती ऍक्टिव्हिटी  करा. अशी कुठली ऍक्टिव्हिटी  आहे? तर डूइंग नथिंग. म्हणजे काहीच न करणो. थोडक्यात सांगायचं तर रिकामं बसणो, आढ्याकडे नजर लावून बसणो, तंद्री लावून बसणो, काहीच न करणो इत्यादी इत्यादी!!  म्हणजे जे केल्याबद्दल तुम्हाला मोठी माणसं ओरडतात ते!पण खरं सांगू? मुलांना मोठं होतांना हा काहीच न करण्याचा वेळ फार महत्वाचा असतो. कारण तुम्हाला जे काय भारी सुचतं ते सगळं त्या काही न करण्याच्या वेळातच सुचतं. कारण तेव्हा तुमचं डोकं पूर्ण रिकामं आणि शांत असतं. तुम्हाला ढगांचे आकार दिसतात, पक्ष्यांचं ओरडणं ऐकू येतं, दिवस मावळून संध्याकाळ होते आणि हळूच पहिली चांदणी दिसायला लागते ते लक्षात येतं, हा निवांतपणा सगळ्या आयुष्यात महत्वाचा असतो. आणि तो एन्जॉय करण्याची सवय लहानपणी लागायला लागते. त्यामुळे बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी करा, नव्या गोष्टी शिका, पण या सगळ्यात  ‘काही न करण्यासाठी’ थोडा वेळ राखून ठेवायला विसरू नका!