पार्टी करून पोहण्यासाठी पाण्यात उतरले; २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, कुंड मळा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:35 IST2026-04-17T19:34:36+5:302026-04-17T19:35:14+5:30

मित्रांसोबत पार्टी करून झाल्यावर पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता, पाण्याची खोली लक्षात न आल्याने तरुण पाण्यात बुडाला

After partying, a 24-year-old youth went into the water to swim incident at Kund Mala | पार्टी करून पोहण्यासाठी पाण्यात उतरले; २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, कुंड मळा येथील घटना

पार्टी करून पोहण्यासाठी पाण्यात उतरले; २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, कुंड मळा येथील घटना

पवनानगर: तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंड मळा परिसरात आज सलग तिसऱ्या दिवशी बुडण्याची घटना घडली असून, प्रथमेश लोणारी (वय २४, रा. फुगेवाडी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश लोणारी हा आपल्या चार-पाच मित्रांसह फिरण्यासाठी कुंड मळा येथे आला होता. यावेळी मित्रांनी पार्टी करून पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता, पाण्याची खोली लक्षात न आल्याने प्रथमेश पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती सागर भेगडे यांनी तातडीने दिली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांच्या रेस्क्यू टीमने त्वरित घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अवघ्या ५ ते १० मिनिटांत टीमला तरुणाचा शोध घेण्यात यश आले.

त्यानंतर प्रथमेश याला तात्काळ तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी मृतदेह तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आला आहे. या बचावकार्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या टीममधील निलेश गराडे, भास्कर माळी, रवी कोळी, विराज गराडे, विनय सावंत, शाहरुख सय्यद, राजू सय्यद, सागर भेगडे, कुंदन भोसले यांनी सहभाग घेतला. तसेच तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनीही मदत केली. दरम्यान, कुंड मळा परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी होत आहे.

Web Title : पार्टी के बाद तैरने उतरा युवक डूबा, कुंड माला की घटना

Web Summary : तलेगाँव दाभाड़े के पास कुंड माला में पार्टी के बाद तैरने उतरे 24 वर्षीय युवक की डूबने से मौत हो गई। बचाव दल ने शव बरामद किया, लेकिन अस्पताल में उसे मृत घोषित कर दिया गया। क्षेत्र में डूबने की यह तीसरी घटना है, जिससे निवासियों में सुरक्षा को लेकर चिंता है।

Web Title : Youth Drowns After Swimming Post Party at Kund Mala

Web Summary : A 24-year-old man drowned in Kund Mala near Talegaon Dabhade after swimming following a party with friends. Rescue teams recovered the body, but he was declared dead at the hospital. This incident marks the third drowning in the area, raising safety concerns among residents.