देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात घट आली होती. पण, सध्या चोरट्यांनी याचा फायदा घेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीच्या काळात वाढत्या चोऱ्या रोखणे हे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ...
दोन दिवसात नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फुटली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलून नेला. तेलाचे पिपे, किराणा माल चोरटे खरेदी केल्याप्रमाणे अंगाखांद्यावरून घेऊन जातात. ही बाब सर्वांनाच धक्का देणारी आहे. राजरोसपणे चोरी करण्याचे ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहेत. संपूर्ण यंत्रणा सध्या यावरच काम करताना दिसत आहे. याचा फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. दहा दिवस रेतीघाट सुनसान पडले होते. परंतु आता अधिकारी व्यस्त झाल्याने पुन्हा रेती तस् ...
चार दिवसांपूर्वी बोदली घाटातून रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त केले होते. कृपाळा नदी घाटातूनही रेतीची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती पथक क्रमांक २ ला प्राप्त झाली. त्यानुसार नदी पात्रात धडक दिली असता, गोकुलनगर येथील संजय बाबाजी लेनगुरे यांच्य ...
नुकत्याच येऊन गेलेल्या अंधाधुन चित्रपटासारखीच ही घटना आहे. चित्रपटात सहानुभूती मिळवण्यासाठी नायक अंध असल्याचे दाखवतो. येथे खटले रद्द करण्यासाठी अंध असल्याचे प्रमाणपत्र दाखवीत आहे. ...
१४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या ...
जाम येथील वॉर्ड तीनमधील निवटे कॉलनी परिसरातील रहिवासी अशोक गंगाराम कापकर यांची पत्नी कामानिमित्त हिंगणघाट येथे गेली होती. दुपारच्या सुमारास अशोक कापकर मुलांसह नाश्ता करण्यासाठी चौकात गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दारातून प्रवेश करीत क ...