दिवसाढवळ्या घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 05:00 AM2020-03-15T05:00:00+5:302020-03-15T05:00:06+5:30

जाम येथील वॉर्ड तीनमधील निवटे कॉलनी परिसरातील रहिवासी अशोक गंगाराम कापकर यांची पत्नी कामानिमित्त हिंगणघाट येथे गेली होती. दुपारच्या सुमारास अशोक कापकर मुलांसह नाश्ता करण्यासाठी चौकात गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दारातून प्रवेश करीत कपाटात ठेवलेले १० तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजारांसह एक मोबाईल चोरी करून मागच्या दारातून पोबारा केला.

Day-to-day burglary | दिवसाढवळ्या घरफोडी

दिवसाढवळ्या घरफोडी

Next
ठळक मुद्देदागिन्यांसह रोख लंपास । जाम येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील जाम चौरस्ता येथे भरदिवसा घरफोडीची घटना शनिवारी घडली. चोरट्यांनी घरातून १० तोळ्यांच्या दागिन्यांसह ४० हजार रुपयांची रोख व मोबाईल संच चोरून नेला.
जाम येथील वॉर्ड तीनमधील निवटे कॉलनी परिसरातील रहिवासी अशोक गंगाराम कापकर यांची पत्नी कामानिमित्त हिंगणघाट येथे गेली होती. दुपारच्या सुमारास अशोक कापकर मुलांसह नाश्ता करण्यासाठी चौकात गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दारातून प्रवेश करीत कपाटात ठेवलेले १० तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजारांसह एक मोबाईल चोरी करून मागच्या दारातून पोबारा केला. अशोक कापकर घरी पोहोचल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title: Day-to-day burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर