कोरोनाच्या सावटात रेती तस्करांना घाट मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:44+5:30

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहेत. संपूर्ण यंत्रणा सध्या यावरच काम करताना दिसत आहे. याचा फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. दहा दिवस रेतीघाट सुनसान पडले होते. परंतु आता अधिकारी व्यस्त झाल्याने पुन्हा रेती तस्करांनी डोके वर काढले आहेत. तुमसर तालुक्यातील रेती घाटावर गत चार दिवसांपासून पुन्हा रेती तस्करी वाढली आहे.

In the shadow of Corona, free the sand smugglers | कोरोनाच्या सावटात रेती तस्करांना घाट मोकळे

कोरोनाच्या सावटात रेती तस्करांना घाट मोकळे

Next
ठळक मुद्देतस्करांचा धुमाकुळ : महसूल आणि पोलीस यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महसूल आणि पोलीस प्रशासन कोरोना संसर्ग प्रतिबंधात व्यस्त असल्याचा फायदा जिल्ह्यातील रेती तस्कर घेत आहेत. दहा दिवसानंतर पुन्हा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीची लूट सुरु झाली आहे. रेतीघाटावरून टिप्पर नागपुरच्या दिशेने धावताना दिसत असून तुमसर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा प्रकार सुरु आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहेत. संपूर्ण यंत्रणा सध्या यावरच काम करताना दिसत आहे. याचा फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. दहा दिवस रेतीघाट सुनसान पडले होते. परंतु आता अधिकारी व्यस्त झाल्याने पुन्हा रेती तस्करांनी डोके वर काढले आहेत. तुमसर तालुक्यातील रेती घाटावर गत चार दिवसांपासून पुन्हा रेती तस्करी वाढली आहे. या रेतीतस्करांनी याबाबत नुकतीच बैठक घेतल्याची माहिती आहे. महसूल व पोलीस विभागाने हिरवी झेंडी दिल्याने तस्करी सुरु झाल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या धास्तीने शहरातील वर्दळ कमी झाली आहे. गर्दी टाळली जात आहे. त्यामुळे रेती तस्करांची वाहने सुसाट वेगाने बिनबोभाट धावत असल्याचे दिसत आहे. रात्रभर रेतीचा उपसा सुरु असला तरी घाटावर जाण्यासाठी सध्या कुणालाही वेळ दिसत नाही. त्यामुळेच रस्त्यावरून धावणाऱ्या रेती ट्रकची संख्या वाढली आहे. कोरोना एकीकडे सर्वांसाठी संकट म्हणून उभे असताना तस्करांसाठी मात्र ती पर्वणी ठरत असल्याचे दिसत आहे. याबाबत कुणी तक्रार केली तरीही प्रशासन दखल घेत नाही.

तुमसर रेतीचे प्रमुख केंद्र
संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तुमसर चोरीच्या रेतीचे केंद्र म्हणून पुढे आले आहे. येथे रेती तस्करींच्या आठ ते दहा टोळ्या सक्रीय आहेत. या सर्वांमध्ये समन्वय असून एकमेकांच्या कार्यात ते हस्तक्षेप करीत नाही. साम, दाम, दंड याचा वापर करण्यात हातखंडा आहे.

Web Title: In the shadow of Corona, free the sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.