जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. ...
उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे. ...
परिसरात महावितरण कंपनीच्या उघड्या डीपीमुळे दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही परिसरातील उघड्या डिपी तातडीने बंदिस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. ...
शेतकरी कृषीपंपाच्या वीजेचे देयक नियमित भरत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीला दरवेळी मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची यातून सुटका करण्यासाठी सौर उर्जेवरील कृषीपंप देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. ...
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव परिसरात शुक्रवारी जोरदार वादळ आल्याने आमपायली रस्त्यालगतचे चार विद्युत खांब कोसळले. परिणामी या भागातील वीज खंडित झाली. त्याबरोबरच भ्रमणध्वनी सेवा ठप्प पडल्याने येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ...
तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलरचा शॉक लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या अनेक अप्रिय घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे कुलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. ...
शहर व परिसरात ४ एप्रिल रोजी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह २० ते २५ मिनीटे पाऊस पडला. या वादळी वाऱ्याने खानापूर चित्ता येथे विजेच्या पोलवर झाड पडले. संध्याकाळी साडेचार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. ...