देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते. पण उमेदवारी दिली नाही. ३५ वर्षे निष्ठेने सेवा करणाऱ्यांवर अन्याय केला, अशी टीका करण्यात आली आहे. ...
नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बराच गोंधळ झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्याच पक्षावर केला. ...
रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमागे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यामुळे ठाकरे गट संतापला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कराड येथील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असून, यात विदर्भातील ६२ मतदारसंघांचे निकाल काय लागतील, याबद्दलच जास्त उत्सुकता आहे. याच ६२ जागांपैकी ज्याला जास्त जागा मिळतील, त्यांचे सरकार येण्याची संधी अधिक असणार आहे. ...