Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Kukdeshwar Hirda Project : जुन्नर तालुक्यातील आदिवासी विभागातील महत्त्वाचा प्रकल्प श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या. हा प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजपासून 'जनसन्मान यात्रा' नाशिक येथून सुरू होणार आहे. या यात्रेत गोकुळ झिरवाळ सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजप आता राज्यसभेची एक जागा त्यांना देणार का याबाबत लवकरच निर्णय होईल. ...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा महिनाभरात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे, यात्रा सुरू झाल्या आहेत. ...