शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग, लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 23:58 IST

लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत.

- पंकज पाटील अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र या निर्णयाचा कोणताही फायदा कोरोनाची संख्या कमी करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून जे लॉकडाऊन राबविण्यात आले त्याचा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग झाला हेच समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रस्त्यांवर कोणीच दिसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते.मात्र गेल्या तीन आठवड्यात प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन राबवण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. केवळ दुकाने बंद ठेवून प्रशासन लॉकडाऊनचे यश शोधण्याच्या मागे लागले आहे.शहरातील रिक्षा आणि दुचाकीस्वार रस्त्यावर भटकत आहेत. नागरिकही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कितपत यश येईल याची शाश्वती खुद्द प्रशासनही देऊ शकत नाही. शहरात लॉक डाऊन शिथिल झाल्यावर व्यापाºयांना एक दिवसाआड दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. असे असूनही रुग्णांच्या संख्येत वाढच झालेली आहे.शहराच्या हिताच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला प्रत्येकवेळी मदत केली आहे. आता प्रशासनाने व्यापाºयांच्या हिताचाही विचार करावा. शहरात व्यापाºयांना योग्य अटी आणि नियम घालून व्यवसाय करण्याची संधी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे. २२ मार्चपासून ते १२ जुलैपर्यंत मोजक्या दिवसांत व्यापाºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता व्यापारी आपला तोटा किती सहन करणार, याचाही विचार करण्याची गरज आहे.- खानजी धल, अध्यक्ष,अंबरनाथ व्यापारी संघ

टॅग्स :thaneठाणे