शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

आता तरी जाग येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 2:21 AM

रिक्षाचा प्रवास असुरक्षित; ‘त्या’ घटनेमुळे चिंतेचे वातावरण

- प्रशांत मानेकल्याण : रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानी भाडेवसुलीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना कल्याणमध्ये नुकतीच एक संतापजनक घटना घडली. रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत रिक्षाचालकाने अश्लील भाषेत बोलत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. एकीकडे अवैध रिक्षा चालवणाऱ्यांकडे वाहतूक प्रशासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असताना नुकत्याच घडलेल्या प्रकारानंतर तरी संंबंधित यंत्रणेचे डोळे उघडतील का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पश्चिमेत राहणारी १४ वर्षांची मुलगी शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना एका रिक्षाचालकाने प्रवासादरम्यान तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे रिक्षाचा प्रवास असुरक्षित झाल्याचे पुन्हा उघड झाले आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटना सातत्याने करत आहे. रोजगाराचे कारण देत हे परवाने सरकारने सुरूच ठेवले असताना दुसरीकडे परवान्यांची ही खिरापत रिक्षा व्यवसायाच्या मुळावर उठली आहे.

कल्याण असो अथवा डोंबिवली, आज अनेक रिक्षा अवैध व्यवसाय करत आहेत. पासिंगविना त्या रस्त्यावर धावत आहेत. रिक्षा चालवणाºया चालकांकडे परवाना आणि बॅज असणे बंधनकारक आहे. काही रिक्षाचालक बॅज आणि परवाना नसलेल्या व्यक्तींना रिक्षा चालवायला अथवा भाड्याने देत आहेत. रिक्षाचा प्रवास असुरक्षित झाला असताना एका रिक्षाचालकाने अल्पवयीन शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार नुकताच घडला आहे.

पोलिसांकडून त्यांच्या स्तरावर कारवाई केली जाईल, पण अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून संबंधित प्रशासकीय यंत्रणा खबरदारी घेतील का? याबाबत सवाल उपस्थित होत आहे. अवैध रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे दावे नेहमीच आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून केले जात असले तरी कल्याणमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेतून बोध घेऊन आता तरी संबंधित यंत्रणेने डोळसपणे कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

आरटीओ, वाहतूक शाखेचे होतेय अक्षम्य दुर्लक्ष

रिक्षाचालकांना गणवेश बंधनकारक आहे, पण आजच्या घडीला १५ ते १६ वर्षांची मुले बर्मुडा, हाफ पॅण्ट, टी-शर्ट अशा पेहरावात रिक्षा चालवताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण गुटखा, मावा, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन करतात. रिक्षा स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानी भाडेआकारणीही त्यांच्याकडून केली जात असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये

बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.

अशा वर्तणुकीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालकही बदनाम होत आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असताना प्रवाशांना मारहाण करणे, एकट्या दुकट्या प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन लुटणे असे प्रकार आधीही घडले आहेत. प्रवाशाजवळील मोबाइल, रोकड तसेच सोने चांदीचे दागिने लुबाडण्याच्या घटनाही सहप्रवाशाकडून रिक्षात घडल्या आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस