शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कल्याण पूर्वेत बंडखोरांना ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 1:18 AM

कल्याण : बंडखोरीमुळे कल्याण पूर्व मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे तर्क लावले जात होते. मात्र, हा ...

कल्याण : बंडखोरीमुळे कल्याण पूर्व मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे तर्क लावले जात होते. मात्र, हा गड भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी राखला आहे. शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचे त्यांना आव्हान होते. परंतु, गायकवाड यांनी १२ हजार २५७ मताधिक्यासह हॅट्ट्रिक साधली आहे. तसेच काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शैलेश तिवारी यांनाही मतदारांनीठेंगा दाखवल्याचे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.

कल्याण पूर्वेतील निवडणूक बंडखोरीमुळे चांगलीच गाजली. २०१४ च्या तुलनेत मतांची टक्केवारी घटल्याने ही मते एकूण १९ उमेदवारांपेक्षा कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता होती. मतदारसंघातील ३४६ मतदानकेंद्रांवर मतदान झाले. मात्र, मतमोजणी उल्हासनगरच्या व्हीटीसी ग्राउंडमधील बॅडमिंटन हॉलमध्ये झाली. १६ टेबलांवर मतमोजणीच्या २५ फेऱ्या पार पडल्या.सकाळी ८.१५ ला मतमोजणीला प्रारंभ झाला, तेव्हा उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पहिल्या फेरीचा निकाल साधारण अर्ध्या तासात आला. या फेरीत गायकवाड यांना ७७२ मतांची आघाडी मिळाली, ती पुढच्या फेऱ्यांमध्येही चढत्या क्रमाने कायम राहिली. अखेर, २५ व्या फेरीपर्यंत त्यांना १२ हजार २५७ मतांपर्यंत आघाडी मिळाली. ज्यावेळी त्यांनी आठ हजारांच्या फरकाने मताधिक्य घेतले होते, तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. फक्त उर्वरित फेºया होऊन विजयी घोषणेची औपचारिकताच केवळ बाकी होती. आपला विजय निश्चित असल्याचे समजताच गायकवाड मतमोजणीकेंद्रावर आले.

अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे हे मतमोजणीच्या ठिकाणी फिरकलेच नाहीत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे पहिल्या फेरीपासून उपस्थित होते. मात्र, त्यांना पराभवाची चाहूल लागताच त्यांनीही तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी उशिरा मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर २िला. यात गायकवाड यांना ६० हजार ३३२ मते, बोडारे यांना ४८ हजार ७५ ही दुसºया, तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांना १६ हजार ७५७ इतकी मते मिळाली. नोटाला तीन हजार ६९० मते दिली. तीन मतदानयंत्रांमध्ये बिघाड मतमोजणी तीन ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे त्या यंत्रांमधील मतमोजणी दुरुस्तीनंतर अखेरच्या क्षणी करण्यात आली. त्यामुळे निकाल लांबल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-east-acकल्याण पूर्व