लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महासभेतील भाजप आणि शिंदेसेनेतील नगरसेवकांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आमची युती आहे, परंतु काही कुरबुरी असतील तर त्या दूर केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी नगरसेवकांची बैठक घेऊन भाजप आणि शिंदेसेनेतील नगरसेवकांमधील वाद वरिष्ठ पातळीवर सोडविला जाईल, अशी ग्वाही दिली होती. ठाणे महापालिकेतील शिंदेसेनेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. ते म्हणाले, काही गोष्टींवरून कुरबुरी असू शकतात, मात्र त्या दूर केल्या जातील. आमची युती आहे, त्यामुळेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमालादेखील भाजपचे उपमहापौर व इतर पदाधिकारी आले आहेत. शिवसेनेला ठाण्याने पहिली
सत्ता दिली. स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी विशेष योगदान
दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील ठाण्यावर विशेष प्रेम होते, असेही ते म्हणाले.
ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
जुन्या नगरसेवकांनी आता नवीन नगरसेवकांना सामावून घेत विकास कसा करायचा, हे शिकविले पाहिजे. नाही तर जुने नगरसेवक आपल्याच वॉर्डाचा विकास करत बसतील. तर तसे करू नका. ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थायी समितीसह इतर समित्यादेखील मार्गी लावल्या जातील, असेही ते म्हणाले.
Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde will address disagreements between BJP and Shinde Sena corporators in Thane. He assures that any issues within the alliance will be resolved. He emphasized unity and urged experienced corporators to guide new ones in development initiatives, maintaining public trust.
Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे में भाजपा और शिंदे सेना के पार्षदों के बीच असहमति को दूर करेंगे। उन्होंने आश्वासन दिया कि गठबंधन के भीतर किसी भी मुद्दे का समाधान किया जाएगा। उन्होंने एकता पर जोर दिया और अनुभवी पार्षदों से विकास पहल में नए लोगों का मार्गदर्शन करने, सार्वजनिक विश्वास बनाए रखने का आग्रह किया।