शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मार्चनंतर पुन्हा पाणीकपातीचे संकट !

By admin | Updated: January 30, 2016 02:24 IST

पाण्याची कमतरता लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून लागू केलेली ३० टक्के म्हणजे आठवड्यातून दोन दिवसांची पाणीकपात कायम ठेवून

ठाणे : पाण्याची कमतरता लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून लागू केलेली ३० टक्के म्हणजे आठवड्यातून दोन दिवसांची पाणीकपात कायम ठेवून मार्चनंतर त्यात वाढ करण्याचे संकेत लघुपाटबंधारे विभागाने शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत दिले. विशेष म्हणजे मीरा-भार्इंदरला दिलेली सवलत रद्द केली असून त्यांनाही पाणीकपातीची सक्ती केली आहे.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीसह टेमघर आणि एमजेपीचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन दिवसांची पाणीकपात आधीच लागू केलेली आहे. मात्र, मीरा-भार्इंदर महापालिका काही दिवसांपासून या कपातीतून वगळण्यात आली होती. सर्वांनाच सक्तीची पाणीकपातत्यामुळे अन्य महापालिकांवर अन्याय झाला होता. तो दूर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घेऊन मीरा-भार्इंदरसह सर्वांनाच सक्तीची पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे ३० टक्के पाणीकपातीनुसार टेमघर प्राधिकरणाकडून मीरा-भार्इंदरला होणारा पाणीपुरवठा आता आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचे निश्चित झाले आहे. पावसाच्या अवकृपेमुळे बारवी व आंध्रा धरणात या वर्षीदेखील पाणीसाठा कमी आहे. हा उपयुक्त पाणीसाठा १५ जुलैपर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आधीच सर्व महापालिकांसाठी ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही कपात लागू राहणार आहे. त्यानंतर, उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून वाढीव पाणीकपातीचा निर्णय घेण्याचे संकेत या वेळी देण्यात आले आहे. उपलब्ध जलसाठ्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या विभागाद्वारे सर्वांसाठी सक्तीची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला जातो. याप्रमाणे मार्चनंतर संभाव्य वाढीव पाणीकपात करण्याचे संकेत लघुपाटबंधारेने दिले.