शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावली, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले 'हेल्थ अपडेट्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:38 IST

विनोद कांबळीवर ठाण्यातील रुग्णालयात सुरु आहेत उपचार

Vinod Kambli Admitted To Hospital : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळकुम येथील प्रगती हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर आवश्यक चाचण्या  करण्यात आल्या असून क्रिकेटरवर सध्या आयसीयूत उपचार सुरु आहेत.  

क्रिकेटरला नेमकं काय झालंय?

किडनीशी संबंधित आजारामुळे यूरिन इन्फेक्शनच्या समस्येनं क्रिकेटर त्रस्त आहे. याशिवाय ताप आणि डोकेदुखी यासारखी लक्षणंही त्याच्यात दिसून येत आहेत. शनिवारी रात्री माजी क्रिकेटरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी स्कॅन करण्यात आले असून त्याचे रिपोर्ट्स हे संध्याकाळपर्यंत येतील. सध्याच्या घडीला त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी माहिती प्रगती हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश सिंह यांनी दिली आहे. ते आपल्या पत्नीशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलतात, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. 

कांबळीचा तो व्हिडिओ पाहून अनेकांना बसला धक्का

काही दिवसांपूर्वीच क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात क्रिकेटचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळीही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. याच कार्यक्रमात विनोद कांबळीची प्रकृती त्याला साथ देत नाही, ते समोर आले होते. अडखळत बोलणं अन् अधाराशिवाय उभे राहणेही कांबळीला जमत नाही, हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर विनोद कांबळीनं एक मुलाखतही दिली. ज्यात त्याने आरोग्यसंबंधित वेगवेगळ्या समस्येचा सामना करत असल्याचे सांगितले होते. या परिस्थितीतही सचिन सोबत आहे, त्याने रुग्णालयातील खर्च उचलला, ही गोष्टही त्याने शेअर केली होती. 

 

टॅग्स :Vinod Kambliविनोद कांबळीthaneठाणेhospitalहॉस्पिटल