शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडचे वर्धमान फॅण्टसी सील

By admin | Updated: February 20, 2016 02:00 IST

मीरा रोड येथील शिवार गार्डनच्या आरक्षित जागेवर चार वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर सुरू केलेल्या वर्धमान फॅण्टसी या मनोरंजन पार्कची पालिकेला देय असलेली सुमारे ४५ लाखांची रक्कम वारंवार नोटिसा

राजू काळे ,  भार्इंदरमीरा रोड येथील शिवार गार्डनच्या आरक्षित जागेवर चार वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर सुरू केलेल्या वर्धमान फॅण्टसी या मनोरंजन पार्कची पालिकेला देय असलेली सुमारे ४५ लाखांची रक्कम वारंवार नोटिसा धाडूनही व्यवस्थापनाने ती थकवल्याने प्रशासनाने अखेर त्या पार्कला गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास सील ठोकल्याचे प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.पालिकेने येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली सुमारे ४५ हजार चौमी जागा विजय वर्धमान या मुंबईतील विकासकाला बीओटी तत्त्वावर मनोरंजन पार्क विकसित करण्यासाठी दिली होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. या मनोरंजन पार्कमध्ये शहरवासीयांना सुमारे २ रु. प्रतिव्यक्तीप्रमाणे किफायतशीर दरात प्रवेश शुल्क आकारण्याचे निश्चित केले असले तरी त्याच्या आतील मनोरंजन महागडे ठरत असल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पालिकेने अनेकदा केलेल्या कारवाईतून उजेडात आले आहे. या जागेच्या वापरापोटी पार्कच्या चालकाकडून पालिकेला सुमारे २५ लाख रु. वार्षिक भाडे देण्याचे निश्चित केले आहे. ते थकवल्याप्रकरणी पालिकेने काही महिन्यांपूर्वी हे पार्क सील केले होते. तसेच बिल थकवल्याप्रकरणीसुद्धा वीज कंपनीने या पार्कचा वीजपुरवठा खंडित केला होता. तद्नंतर, या पार्कमधील अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागानेही आर्थिक दंड ठोठावला होता. अशा थकबाकीसह अस्वच्छतेमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या या पार्कच्या चालकाने पालिकेचे गेल्या दोन वर्षांचे ४५ लाख ४५ हजार रु. भाडे थकवले आहे. ते वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार नोटिसा पाठवून कारवाईची नोटीसही धाडली होती. परंतु, त्याला त्याने प्रतिसाद न दिल्याने अखेर बांधकाम विभागाने हे पार्कच सील करण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. त्यानुसार, गुरुवारी सील ठोकण्याची कारवाई केली.