शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोणार्क आघाडीत अस्वस्थता

By admin | Updated: May 13, 2017 00:48 IST

भाजपामधील निष्ठावंत आणि संघ परिवाराचा विरोध दिवसेंदिवस कडवा होत गेल्याने आपल्या उमेदवारांना धोका निर्माण होऊ शकतो,

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भाजपामधील निष्ठावंत आणि संघ परिवाराचा विरोध दिवसेंदिवस कडवा होत गेल्याने आपल्या उमेदवारांना धोका निर्माण होऊ शकतो, या कल्पनेने कोणार्क विकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी कोणार्कने भाजपाशी समझोता केल्याने तो पक्ष कडव्या झुंजीच्या तयारीने उतरला आहे. काँग्रेसचा कोणार्कला विरोध आहेच, पण इतर सर्व पक्षांनीही भाजपासोबत कोणार्कशीही लढण्याचे ठरवल्याने त्यात भर पडली आहे.मागील निवडणुकीनंतर अवघ्या सहा जागा असूनही कोणार्कआघाडी महापौरपद पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली होती. आताही त्यांना महापौरपद हवे आहे. त्याचवेळी भाजपाच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे खासदार कपिल पाटील यांना त्यांच्या पुतण्याला त्या पदावर संधी द्यायची आहे. त्यामुळे जागावाटपाचा समझोता करूनही आतापासूनच या दोन्ही पक्षांत या पदासाठी सुप्त स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात दोन्ही पक्षांपैकी कुणाच्या किती जागा येतात यानुसार तो पक्ष वरचढ ठरेल, हे नक्की. कोणार्कआघाडी २२ आणि भाजापा ६० जागा लढवत असले, तरी त्यांनी आणखी एक-दोन जागांवर काही उमेदवारांवर गळ टाकला आहे. भाजपा लढवत असलेल्या जागा अधिक असल्या, तरी त्या पक्षाचा तेवढा विस्तार नाही, ही मुख्य अडचण आहे.मात्र भाजपाला हात देऊनही पक्षातील निष्ठावंत आणि नवभाजपावाद्यांतील संघर्ष तीव्र झाल्याने त्याचा फटका कोणार्कला बसू लागला आहे. दोन प्रभागात संघ आणि परिवारातील इतर संघटनांनी थेट विरोधाचे अस्त्र उगारल्याने कोणार्कमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.एकीकडे भाजपा नेते समझोता झाल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष वॉर्डावॉर्डांत तो समझोता नाकारला जात आहे. भाजपाने कोणार्क विरोधात उमेदवार उतरवलेले नाहीत. एकवेळ भाजपा कार्यकर्त्यांनी कोणार्कचा प्रचार केला नाही तरी चालेल, पण इतर पक्षांसारखा त्यांच्या कार्यकर्त्यांनी संघ परिवाराने विरोध सुरू केला, तर उमेदवारांची प्रचंड कोंडी होईल, या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे भाजापासोबत असूनही कोणार्क आघाडी एकला चलो रे या पद्धतीने काम करत आहे. भाजपाला भिवंडीत अन्य पक्षाकडून उमेदवारांना फोडण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे कोणार्कसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संघाने विरोध करण्यास सुरुवात केली आहे.