शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

ठाण्यातील गणेश मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:17 PM

सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरणाºया अजय जयस्वार (२२, रा. मानपाडा, ठाणे) आणि सलमान खान (२०, रा. मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देदानपेटीतील रोकड हस्तगतकापूरबावडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मानपाडा येथील सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरणाºया अजय जयस्वार (२२, रा. मानपाडा, ठाणे) आणि सलमान खान (२०, रा. मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मानपाडा भागात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कापूरबावडी पोलिसांची ३ डिसेंबर रोजी पहाटे २.५० वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील गणेश रोडवर पेट्रोलिंग सुरु होती. त्यावेळी दोघेजण मंदिराच्या बाहेरुन संशयास्पदरित्या जातांना आढळले. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. मांढरे, पोलीस हवालदार एस. एल. खोडे, पोलीस नाईक सी. डी. शिंदे, आर. एस. राठोड, एस. ए. काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. चव्हाण आदींच्या पथकाने त्यांची झडती घेतली. त्यावेळी मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून दानपेटीतील रोख रक्कम चोरल्याची त्यांनी कबूली दिली. त्यांच्याकडून ६४५ रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांनी तिजोरी फोडण्यासाठी कोणती हत्यारे वापरली? दानपेटीतील आणखी नेमकी किती रक्कम चोरली? त्याचबरोबर परिसरात त्यांनी आणखी चोºया केल्या आहेत का? याबाबतच्या चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी