खूनाची धमकी देत उद्योजकांकडून सहा लाखांची खंडणी उकळणारे तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:51 PM2020-12-04T16:51:51+5:302020-12-04T16:57:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खूनाची धमकी देत उद्योजकाकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (२५, रा. अंबिकानगर, ठाणे ...

Three arrested for extorting Rs 6 lakh from businessmen | खूनाची धमकी देत उद्योजकांकडून सहा लाखांची खंडणी उकळणारे तिघे जेरबंद

आणखी ६० लाखांची केली होती मागणी

Next
ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई आणखी ६० लाखांची केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खूनाची धमकी देत उद्योजकाकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (२५, रा. अंबिकानगर, ठाणे), सोमनाथ दाभाडे (३५, रा. जयभवानीनगर, ठाणे)आणि शरद मोहतेकर (४०, चितळसर, ठाणे) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून सुरू आहेत. या संदर्भातील काही तक्र ारी उद्योजकांच्या ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन (टिसा) या संघटनेकडे आल्या होत्या. त्याच अनुषंगाने एका उद्योजकाने दिलेल्या तक्रारीनुसार पटेकर याच्यासह तिघांनी मिळून जानेवारी २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या दरम्यान त्यांना एमआयडीसीतील जागेच्या विक्री व्यवहारामध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीबरोबरच व्यवहार करण्याची धमकी त्यांनी दिली. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे ३५ लाखांच्या खंडणीचीही मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर ठार मारण्याचीही त्यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे जागेच्या व्यवहारामध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच त्यांच्या जीवाला धोका येऊ नये म्हणून भीतीपोटी या तिघांनाही २७ मार्च २०२० रोजी चार लाख रुपये तसेच १४ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये अशी सहा लाखांची रक्कम या उद्योजकाने दिली. त्यानंतरही जागेच्या हस्तांतरण व्यवहारामध्ये त्यांनी या उद्योजकाकडे आणखी ६० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना पुन्हा खूनाची धमकी देण्यात आली. अखेर या प्रकाराला कंटाळून या उद्योजकाने २ डिसेंबर रोजी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि रवींद्र फड आदींच्या पथकाने या तिघांनाही २ डिसेंबर रोजी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
....................................

Web Title: Three arrested for extorting Rs 6 lakh from businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.