शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ठाणेकरांची पाणीदरवाढ लांबणीवर, महासभा झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:36 IST

महापालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांवर पाणीदरवाढीची कु-हाड कोसळणार होती. परंतु, कोरोनामुळे महासभा पुढे ढकलण्यात आल्याने ती लांबणीवर पडली आहे.

ठाणे : कोरोनामुळे प्रभावित झाल्याने अनेकांना त्याचा फटकाही बसला आहे. मात्र, याचा ठाणेकरांना तूर्तास एक फायदाही झाल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांवर पाणीदरवाढीची कु-हाड कोसळणार होती. परंतु, कोरोनामुळे महासभा पुढे ढकलण्यात आल्याने ती लांबणीवर पडली आहे. यामुळे काही दिवस का होईना, या दरवाढीतून सुटका होऊन ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणीवापराच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, वेळेअभावी ती खंडित केली होती. या सभेमध्ये विषयपत्रिकेवरील प्रस्तावांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यात पाणीवापराच्या दरवाढीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. असे असतानाच ठाणे महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणीवापराच्या दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील पाणीदरवाढीच्या प्रस्तावाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात उमटल्याचे चित्र होते.मात्र, मागील महिन्याची आणि या महिन्याचीही महासभा २० मार्च रोजी घेण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी कमी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केल्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्वच कार्यक्र म रद्द केले असून त्याचबरोबर २० मार्च रोजी आयोजित केलेली महासभा रद्द करून ती पुढे ढकलली आहे. त्यामुळे ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.सभेबाबत अनिश्चितताफेब्रुवारी महिन्यात खंडित झालेली महासभादेखील लांबणीवर पडली असून आता ती केव्हा घेतली जाणार, याबाबत अद्यापही प्रशासनाने निश्चित सांगितले नाही. त्यामुळे कोरोनामुळे का होईना ठाणेकरांवरील पाणीदरवाढ तूर्तास लांबणीवर पडली आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस