क्लस्टरच्या नावाखाली ठाणेकरांची फसवणूक

By Admin | Updated: November 6, 2016 04:14 IST2016-11-06T04:14:29+5:302016-11-06T04:14:29+5:30

मुख्यमंत्र्यानी आधी कल्याण डोंबिवलीकरांची फसवणूक केली आणि ते येत्या निवडणुकीत ठाणेकर नागरिकांची फसवणूक करताहेत. येथील मतदारांनी त्यांच्या भुलथापांना बळी

Thanekar cheating in the name of cluster | क्लस्टरच्या नावाखाली ठाणेकरांची फसवणूक

क्लस्टरच्या नावाखाली ठाणेकरांची फसवणूक

ठाणे : मुख्यमंत्र्यानी आधी कल्याण डोंबिवलीकरांची फसवणूक केली आणि ते येत्या निवडणुकीत ठाणेकर नागरिकांची फसवणूक करताहेत. येथील मतदारांनी त्यांच्या भुलथापांना बळी पडू नये, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ठाण्यात केली.
ठाणे महापालिका ही सत्ताधाऱ्यांचे पोट भरण्याचे साधन आहे. येथील वेगवेगळ्या कंत्राटांमधून मधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत असल्याचेही त्यांनी सांगितले. याच पैशातून येथील नेत्यांच्या मुलांची आलिशान लग्ने होत आहेत. आधी भांडायचे आणि नंतर सत्तेसाठी हे तथाकथित वाघ आणि सिंहांनी एकत्र यायचे, याची यांना सवयच लागल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
ठाणेकर नागरिकांना या लोकांनी क्लस्टरचे गाजर दाखविले. परंतु, प्रत्यक्षात अद्याप त्याची अधिसूचनाच निघाली नसल्याने ही सरळ सरळ ठाणेकरांची फसवणूकच असल्याचेही त्यांनी म्हंटले. ठाण्याचा जो विकास झाला तो आघाडी सरकारमुळेच झाला असून, येथील सत्ताधारी शिवसेनेने नागरिकांची फसवणूक केली असल्याने येथील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसला ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत चांगले यश मिळेल असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Thanekar cheating in the name of cluster