शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:32 IST

All India Police Bodybuilding Championship: अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाण्याच्या पीएसआय स्नेहा सुनील करणाळे यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.

विशाल हळदे / लोकमत, ठाणे हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या ७४व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाणे शहरातील महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सुनील करणाळे यांनी ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. दिनांक २० ते २४ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या भव्य स्पर्धेत देशभरातून तब्बल २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये २७ महिला खेळाडूंचाही समावेश होता.

ठाणे जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी चार खेळाडूंनी आपले प्रतिनिधित्व केले होते. त्यात तिघे पुरुष तर एकमेव महिला खेळाडू म्हणून स्नेहा करणाळे यांनी सहभागी होऊन सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्नेहा करणाळे यांची निवड आगामी वर्ल्ड पोलिस गेम्ससाठी झाली आहे. मार्च २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या या स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ठाणे पोलिस दलातील महिला अधिकारी स्नेहा करणाळे यांच्या या यशामुळे ठाणेकरांचा अभिमान दुणावला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane PSI Sneha Karnale Wins Gold at All India Police Bodybuilding!

Web Summary : Thane's PSI Sneha Karnale secured gold in the All India Police Bodybuilding competition in Haryana. She will represent India at the World Police Games in Perth, Australia, in 2027. Her victory brings pride to Thane.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसthaneठाणेGold medalसुवर्ण पदक