शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Thane: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ८६ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: July 23, 2024 20:44 IST

Thane News: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत (४२, रा. नौपाडा, ठाणे) या संगणक अभियंता महिलेला ८३ लाख २३ हजारांचा गंडा सायबर भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला.

- जितेंद्र कालेकर ठाणे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत (४२, रा. नौपाडा, ठाणे) या संगणक अभियंता महिलेला ८३ लाख २३ हजारांचा गंडा सायबर भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला. माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.

एका खासगी कंपनीमध्ये कामत या संगणक अभियंता म्हणून नोकरीला आहेत. त्या नेहमीच शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करीत असतात. त्यांच्या मोबाइलवरील एका व्हॉटसॲप क्रमांकावर १७ मे २०२४ रोजी अविवा इन्व्हेस्टर या व्हॉटसॲप ग्रुपवर त्यांना समाविष्ट केले. यात चार वेगवेगळे मोबाइल क्रमांक ग्रुप ॲडमीनचे होते. ग्रुपमधील सदस्य एकमेकांमध्ये शेअर मार्केटमध्ये कसा फायदा होतो, याचीच चर्चा करीत होते. कामत यांनीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका व्हीआयपी व्हॉटसॲप ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करून शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळेल, अशी बतावणी केली. २४ मे २०२४ रोजी त्यांनी अविवा मेम्बर-९ या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये त्यांना एक लिंक पाठवली.

एक ॲपही त्यांना इन्स्टॉल करण्यास सांगितले. याच ग्रुपवर त्यांनी शेअर मार्केटसाठी खाते उघडले. त्यानंतर २४ मे २०२४ ते ४ जुलै २०२४ या कालावधीमध्ये या ॲपवर दिलेल्या विविध बँक खात्यांवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या बँक खात्यावरून ८६ लाख २३ हजार रुपये भरले. या गुंतवलेल्या पैशांचे मूल्य वाढून २ कोटी ६ लाख ९४ हजार झाल्याचे संबंधित ॲपवर दाखविण्यात आले. शेअरचा भाव वधारल्याने त्यांनी या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे मिळालेच नाही. त्यानंतर त्यांना टॅक्स भरण्यास सांगण्यात आले. मात्र, जादा परतावा किंवा मुद्दल अशी कोणतीच रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कामत यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात २१ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल केला. सायबर विभागामार्फत आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले............

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी