शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोफत सॅनिटरी नॅपकिनच्या मागणीसाठी ठाण्यात तहसीलदारांना साकडे!

By सुरेश लोखंडे | Updated: March 16, 2026 19:03 IST

Thane News: गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष वेधत श्रमजीवी संघटनेच्या महिलांच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

- सुरेश लोखंडे

ठाणे  - गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष वेधत श्रमजीवी संघटनेच्या महिलांच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. रेशन दुकानांमार्फत दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना तातडीने सुरू करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली, असे श्रमजीवी संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या नंदा वाघे यांनी लाेकमतला सांगितले.

श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदाेलन केले. त्यानंतर या महिलांनी तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना पिवेदन दिले. या निवेदनात ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी व कातकरी महिला मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या मासिक पाळीच्या काळात त्यांना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे शक्य नाही. अनेक महिलांना अस्वच्छ कापड किंवा इतर अपुऱ्या साधनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग तसेच गर्भाशयाशी संबंधित आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांमार्फत जसे धान्य दिले जाते, त्याच धर्तीवर गरीब, आदिवासी व कातकरी महिलांना दरमहा किमान १२ सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी. तसेच ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळीबाबत स्वच्छता व आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून तातडीने शासन निर्णय काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात ठाणे तहसीलदार ऊमेश पाटील यांना निवेदन देतांना जया पारधी,  लक्ष्मी वाघ, नंदा वाघे, दर्शना आगिवले, मनिषा खोडका आदींचा समावेश होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Plea for Free Sanitary Napkins Submitted to Thane Tehsildar

Web Summary : Shramajivi organization demanded free sanitary napkins for poor, tribal women through ration shops. They highlighted the health risks due to unhygienic practices during menstruation. A plea was submitted to Thane Tehsildar, urging for immediate action and awareness campaigns in rural areas.
टॅग्स :thaneठाणे