शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हवालदारासह एकास कल्याणमध्ये मारहाण

By admin | Updated: May 20, 2017 04:50 IST

पश्चिमेतील शिवाजी चौकात उभ्या केलेल्या मोटारीला वाहतूक विभागाने जॅमर लावल्याने वाहतूक पोलीस हवालदारआणि क्रेनवरील कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात

- लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौकात उभ्या केलेल्या मोटारीला वाहतूक विभागाने जॅमर लावल्याने वाहतूक पोलीस हवालदारआणि क्रेनवरील कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर मुख्य आरोपी, त्याची पत्नी आणि अन्य तिघांचा शोध घेतला आहे.इमान खतरी आणि त्याची पत्नी काही कामानिमित्त गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटारीने शिवाजी चौकात आले होते. मात्र खतरी यांनी त्यांची मोटार रस्त्यात चुकीच्या जागी उभी केल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे क्रेनवरील कर्मचारी दर्शन शिंदे यांनी मोटारीला जामर लावला. खतरी मोटारीजवळ परतल्यानंतर त्यांना ही बाब समजली. जामर काढून त्यांनी तो चोरण्याचा प्रयत्न करताच शिंदे यांनी त्यांना मनाई केली. तसेच त्यांचे फोटो काढले. त्या रागातून खतरी आणि त्यांच्या पत्नीने शिंदे यांनी शिवीगाळ सुरू केली आणि शिंदे यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. ते तेवढ्यावर थांबले नाहीत. तर त्यांनी मुस्ताक खतरी (५०, रा. पत्रीपूल) आणि अन्य तीन नातेवाइकांना फोन करून बोलावले. या तिघांनी तेथे पोहोचताच शिंदे यांना बांबूने मारहाण केली. त्यामुळे तेथे गर्दी जमली. हा प्रकार सुरू असताना वाहतूक पोलीस चंद्रशेखर कदम हे शिंदे यांच्या मदतीसाठी धावताच आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. नंतर कदम यांनी मदतीसाठी प्रयत्न करताच त्या सर्वांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कदम यांच्याकडून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध घेऊन रात्री प्रथम मुस्ताकला अटक केली. पळून गेलेले उर्वरित आरोपी इमान, त्याची पत्नी आणि अन्य तिघा साथीदारांचा शोध सुरू आहे.मुस्ताकला पोलीस कोठडीया घटनेत, मारहाणीत नंतर सहभागी झालेला आरोपी मुस्ताक खतरी याला महात्मा फुले चौक पोलिसांनी शुक्रवारी कल्याणच्या न्यायालयात हजर केले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी ए. पी. लांब यांनी दिली.