शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

केळकरांचे ओझे लेलेंच्या खांद्यावर

By admin | Updated: January 19, 2016 02:12 IST

पक्षबांधणी, शिवसेनेला आक्रमकपणे विरोध आणि अंतर्गत गटातटांना एकत्र करण्याचे आव्हान आ वासून उभे असतानाच आता तत्कालीन शहराध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या

ठाणे : पक्षबांधणी, शिवसेनेला आक्रमकपणे विरोध आणि अंतर्गत गटातटांना एकत्र करण्याचे आव्हान आ वासून उभे असतानाच आता तत्कालीन शहराध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या काळात बंद राहिलेले भाजपाचे शहर कार्यालय सुरू करण्याचे ओझेही नवनियुक्त अध्यक्ष संदीप लेले यांच्या खांद्यावर आले आहे. पक्षाच्या कार्यालयाची थकबाकी आणि दोन कर्मचाऱ्यांचा पगार देणे शक्य नसल्याने हे कार्यालय सध्या बंद आहे. थकबाकी चुकवून हे कार्यालय नव्याने सुरू करत किमान कार्यकर्त्यांचा राबता सुरू करण्यासाठी नव्या अध्यक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यात भाजपाच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा संदीप लेले यांची नियुक्ती झाली. पक्षातील विविध गटातटांतील राजकारणावर अंकुश ठेवण्याबरोबर पक्षबांधणीचे आणि त्याच वेळी आक्रमकपणे आंदोलने उभी करत शिवसेनेची कोंडी करण्याचे आव्हान या अध्यक्षांपुढे उभे ठाकले आहे. या आव्हानांना हात घालण्यापूर्वीच त्यांना गेल्या सात महिन्यांपासून खोपट येथील बंद असलेले शहर कार्यालय पुन्हा सुरू करण्याचे आव्हान पेलावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन शहराध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांच्या कार्यकाळात दोन ते तीन वेळाच या ठिकाणी बैठका झाल्या होत्या. परंतु, राज्यात सत्ता असूनही त्या ठिकाणी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा पगार देणे शक्य नसल्याने त्यांना तेथून सुरुवातीला निरोप देण्यात आला. इतर खर्चांचा विचार करता नंतरच्या काळात हे कार्यालय चालविणे शक्य नसल्याने गेले सात महिने त्याला कुलूप लागले होते. हा खर्च कोण करणार, हा कळीचा मुद्दा त्यात होता. त्यामुळेच सारे शांत होते. आता या कार्यालयाची थकबाकी लाखोंच्या घरात गेल्याने ती कोण भरणार, असा लाखमोलाचा सवाल मात्र आता उपस्थित झाला आहे.तोवर रविवारपासून पुन्हा या कार्यालयातील जळमटे काढून धूळ झटकण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होते. लवकरच नव्या दिमाखात हे कार्यालय पुन्हा सुरू होईल, असा विश्वास शहर भाजपाने व्यक्त केला आहे.