लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबईत शुक्रवार १५ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. ठाणे, डोंबिवली,कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवार १६ मे रोजी दुपारी १२.३५ वाजता घेता येईल. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त येथूनच हा अनुभव घेता येऊ शकतो. वर्षातून दोनवेळा सूर्य मध्यान्ही दुपारी बरोबर डोक्यावर येतो. दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने अनुभव घेता येत नाही. आपल्या गावच्या अक्षांश इतकी सूर्याची क्रांती (डिक्लिनेशन) झाले की त्यादिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर 'शून्य सावली'चा अनुभव घेता येतो.
Web Summary : Mumbai witnesses 'Zero Shadow' on May 15th at 12:35 PM. Thane, Dombivli, Kalyan, and Borivali will experience it on May 16th. This phenomenon occurs when the sun is directly overhead, twice yearly, but only observable once due to monsoons.
Web Summary : मुंबई में 15 मई को दोपहर 12:35 बजे 'शून्य छाया' का अनुभव होगा। ठाणे, डोंबिवली, कल्याण, और बोरीवली में 16 मई को यह अनुभव होगा। यह घटना वर्ष में दो बार होती है जब सूर्य सीधे ऊपर होता है, लेकिन मानसून के कारण केवल एक बार दिखाई देती है।