शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या तिजोरीत खडखडाट

By admin | Updated: May 13, 2017 00:45 IST

बिले थकीत असल्यामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजीचे वातावरण असताना केडीएमसीचे मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी मार्च

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : बिले थकीत असल्यामुळे कंत्राटदारांमध्ये नाराजीचे वातावरण असताना केडीएमसीचे मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी मार्च २०१७ अखेरची ५४ कोटींची बिले देणे प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण देत जलअभियंता आणि शहरअभियंता यांनी पाठवलेली नवीन बिले स्वीकारण्यास नकार दिला आहे. अत्यावश्यक कामांची बिले फक्त पाठवावीत, अशा सूचना केल्या आहेत.एकीकडे उत्पन्न आणि खर्च यामधील वाढती तफावत, तर अपुरे मिळणारे अनुदान यात केडीएमटीची लाखो रुपयांची देणी प्रलंबित आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना वेतनही विलंबाने मिळत आहे. दरम्यान, मागील वर्षी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट होता. परिणामी, कंत्राटदारांची बिले वेळेवर मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे विकासकामांसाठी कंत्राटदार येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र होते. यंदाही ते कायम आहे. मार्च २०१७ अखेर सुमारे ५४ कोटींची बिले प्रलंबित असल्याचे पत्र चव्हाण यांनी प्रभारी जलअभियंता चंद्रकांत कोलते आणि शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना पाठवले आहे. निधी नसल्याने नव्याने पाठवलेली बिले परत पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. २०१७-१८ मधील बिले उपलब्ध निधीच्या आधारे सादर करण्यास कळवले जाईल. आर्थिक शिस्त राखण्यासाठी आवश्यक कामांचीच बिले सादरकरा, अशा सूचनाही चव्हाण यांनी संबंधित अभियत्यांना केल्या आहेत. निधीअभावी नवीन बिले देण्यास नकार दिल्याने कंत्राटदारांमधील नाराजीचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या या कृतीवर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.