शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रविक्रेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

By admin | Updated: May 13, 2017 00:42 IST

येथील वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या वार्षिक वर्गणीदार योजनेंतर्गत निलेश कोलगे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : येथील वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या वार्षिक वर्गणीदार योजनेंतर्गत निलेश कोलगे या विक्रेत्याने नामांकित कंपनीची दुचाकी जिंकली. संपूर्ण ठाणे शहरातून अशा सुमारे ३६४ विक्रेत्यांना नुकतेच विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, वरिष्ठ महाव्यवस्थापक (वितरण) हारुण शेख यांच्या हस्ते या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ‘लोकमत’च्या विक्रेत्यांसाठी विविध स्तरांवर गेल्या एक वर्षापासून ही स्पर्धा सुरू होती. वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून भरघोस बक्षिसे मिळवण्याची संधी विक्रेत्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. येथील आनंद बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या समारंभात निलेश कोलगे (रा. लोकमान्यनगर) हे लकी ड्रॉचे मानकरी ठरले. एका नामांकित कंपनीची दुचाकी मिळवण्याचा मान त्यांना मिळाला. विशेष म्हणजे हमखास बक्षिसांमध्येही कोलगे यांनी आणखी चार बक्षिसे पटकावली. या वेळी ठाणे जिल्हा वृत्तपत्रविक्रेता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, ठाणे शहर वृत्तपत्रविक्रेता असोसिएशनचे सचिव दिलीप चिंचोळे, मुलुंड वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे राजू धावरे आदी या वेळी उपस्थित होते. वृत्तपत्रविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लोकमत’ने योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी सूचना अजित पाटील यांनी केली. या वाचक वर्गणीदार योजनेत सहभागी झाल्याबद्दल विक्रेत्यांचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही विक्रेत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी ग्वाही त्यांनी विक्रेत्यांच्या वतीने दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) सुबोध कांबळे यांनी केले. तर, जतीन पुरंदरे आणि कांचन माळवे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.