शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराची केली बनावट बिले ?

By admin | Updated: January 3, 2017 05:34 IST

भार्इंदरच्या ‘राई शिवनेरी’ येथील सरकारी जागेवरील बेकायदा घरांना बनावट मालमत्ता कराच्या बिलांद्वारे संरक्षण मिळवून देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

भार्इंदर : भार्इंदरच्या ‘राई शिवनेरी’ येथील सरकारी जागेवरील बेकायदा घरांना बनावट मालमत्ता कराच्या बिलांद्वारे संरक्षण मिळवून देण्यात आल्याचे उघड झाले आहे. सरकारी जागा बळकावण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्याच्या या कारवायांमध्ये पालिकेतील कर्मचारी गुंतल्याची शक्यता नाकारता येत नाही. भार्इंदर पश्चिमेच्या राई येथील ‘शिवनेरी नगर’ हे सरकारी जागेत वसले असून सीआरझेड, कांदळवनांचे हे क्षेत्र आहे. या ठिकाणी आजही महापालिका व स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने सर्रास कांदळवने नष्ट करून बेकायदा झोपड्या व बांधकामे होत आहेत. महसूल विभागाकडून शासकीय जमिनीच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. ‘शिवनेरी नगर’च्या काही भागातील बेकायदा झोपड्या पाडण्याची कारवाई अलीकडेच झाली. उर्वरित बांधकामे तोडायची बाकी असतानाच स्थायी सभापती दालनातील कर्मचारी अशोक टोपले यांच्याकडे दोन वर्षांची मालमत्ता कराची बिले भरण्यासाठी आली. सदर बिले भरण्याचा प्रयत्न केला असता त्याचा तपशील संगणकावर जुळत नव्हता. टोपले यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांकडे त्याची माहिती घेतली असता ती दोन्ही बिले बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सन २०१४-१५ व २०१६-१७ अशा दोन आर्थिक वर्षातील ही झेरॉस बिले मीरा-भार्इंदर महापालिकेच्या लोगो व शिक्क्यासह आहेत. भारतीय गहुकार व सोनिया खातून सलामुल्ला अशी दोन नावे एकाच बिलावर असून कर निर्धारक म्हणून डॉ. दीपक सावंत यांचे नांव व सही आहे. विशेष म्हणजे सावंत यांची दोन वर्षांपूर्वीच बदली झालेली आहे. बिलातील मालमत्ता क्रमांक बनावट आहे. या प्रकरणी करनिर्धारक व संकलक तथा सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)