शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण ठाणेदारांना बदलीचे वेध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:38 IST

काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे.

- चेतन घोगरे
अमरावती - काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मागील काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण विभागात राज्यातून बदली करून आलेल्या पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकपदांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यापैकी काहींना अभिनाश कुमार यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात ठाणेदारपदाचा कार्यभार मिळाला, तर काही अधिकारी अमरावती ग्रामीण मुख्यालय दैनंदिन कामकाज पाहत होते. पण नवे पोलीस अधीक्षक येताच मुख्यालयी असलेल्या पोलीस निरीक्षकांकडून जिल्ह्यातील चांगल्या मलईचे पोलीस ठाणे मिळावे, यासाठी उत्सुक अधिकारी सरसावले आहेत. म्हणून संबंधित पोलीस खात्यातील वरिष्ठ 'गॉडफादर'कडून लॉबिंग लावण्यात येत असल्याचे चित्र आहे. बदलीच्या यादीत वरुड, दतापूर धामणगाव रेल्वे, कुºहा, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, माहुली जहागीर व वाहतूक शाखेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार बदलीबाबत व इतर चर्चेविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती घेतली असता कुणीही वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट बोली शकले नाही.
अतिसंवेदनशील गावांसाठी नवीन ठाणेदार नवखे  काही दिवसांवर गणपती, दुर्गा उत्सव हे येत असून, जिल्ह्यातील काही शहरे व गावे अति संवेदनशील या संवेदनशील आहेत. यामध्ये जुन्या ठाणेदारांची बदली होणे हे शक्य नसल्याचेसुद्धा बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती