शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाच्या ६१ मंडळांना ठाणे महापालिकेच्या नोटिसा

By admin | Updated: October 27, 2015 00:21 IST

परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.

ठाणे : परवानगी न घेता आणि नियम पायदळी तुडवून मंडप उभारणाऱ्या ६१ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. परंतु, ही मंडळे दंड भरणार का, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आधीच १३१ गणेशोत्सव मंडळांनी त्यांना ठोठावलेला १ लाखांचा दंड अद्याप भरलेला नसताना आता पुन्हा नवरात्रोत्सव मंडळांना दंड ठोठावला आहे.यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री दुष्काळ निधी फंडात हा निधी जमा करून त्याची पोचपावती पालिकेकडे आणायची, असे सांगून पालिकेने यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी पालिकेची आहे. त्यानुसार, पालिकेशी पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्यापही एकाही मंडळाने दंड भरलेला नाही.दरम्यान, असे असताना आधीच गणेशोत्सव मंडळांनी ठाणे महापालिकेचे नियम पायदळी तुडविले असतानादेखील आता नवरात्रोत्सव मंडळांवरही पालिकेने लुटूपुटू कारवाईचा दंडुका उगारला आहे. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेने रस्त्यावर मंडप उभारणाऱ्या मंडपांना चपराक लगावण्यास सुरुवात केली आहे.गणेशोत्सवाच्या काळात अशाच प्रकारे रस्त्यावर मंडप उभारून किंबहुना रस्ता अडविणाऱ्या १३१ मंडळांना पालिकेने १ लाख रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या. पाचपाखाडी, टेंभीनाका, मानपाडा अशा विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाचे मंडप रस्त्याच्या मध्यभागी टाकले होते. यामुळे ठाणेकरांना त्याचा त्रास झाला. अनेक ठाणेकरांनी याबद्दल पालिका प्रशासनाकडे तक्र ारीही केल्या होत्या.