शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

बालिशपणाचे विधान, सोशल मीडियावर क्रेझ; आव्हाडांचे सहर शेखला उत्तर, मुंब्र्याचा रंगही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 09:17 IST

NCP SP Group Jitendra Awhad Mumbra News: कोण आया, कोण आया, शेर का शिकारी आया, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचे मुंब्रा येथे स्वागत केले.

NCP SP Group Jitendra Awhad Mumbra News: अलीकडेच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा येथून एआयएमआयएम पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले. मुंब्रा हा कायमच आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत मुंब्रा येथे एमआयएमची एन्ट्री झाल्याचे बघायला मिळाली. एमआयएमकडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या सहर शेख हिने थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर अनेक दिवसांनी जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मीडियाशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सहर शेख हिला उत्तर देताना मुंब्र्याचा रंग कोणता, हेही सांगितले.

मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आया, कोण आया...  शेर का शिकारी आया, अशा घोषणा दिल्या. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता, आज काल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, ही जी नवीन मुले आहेत, ते अशा कल्पक घोषणा करतात. काही जणांनी आव्हान दिले होते, त्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, हाथी चले अपली चाल, कुत्ते भोके हजार, आव्हान देणे हे लोकांचे काम असते. आपण त्यांच्या आव्हानासाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेख यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणे टाळले. 

बालिशपणाचे विधान, सोशल मीडियावर क्रेझ

कैसे हराया..., असे म्हणत सहर शेख हिने विजय जल्लोष साजरा केला होता. या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सहर शेख हिने केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही झाली. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचे फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली... चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही. तसेच हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिला आहे. तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, मी शांत आहे. शांत राहू द्या. अन्यथा काही लोकांची झोप उडेल. माझे तोंड उघडू देऊ नका नाही तर काही लोक जेलमध्ये जातील. मी काम केले म्हणून मोठ्या मताने निवडून आलो. काही माझे मित्र हरले मात्र त्याची लढाई आता सुरू झाली आहे. चॉकलेट खायला दिले असे आमचे लोक बोलणार नाही. मात्र लहान मुलीला काही बोलले तर माफ करा, असे आव्हाड म्हणाले.

 

टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाThane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNCPराष्ट्रवादी काँग्रेस