शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलाच्या तक्रारींकडे महावितरण कंपनीचे अद्यापही दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:24 IST

सरासरी बिलांमध्येही मोठी तफावत : मनसेचा आंदोलनाचा इशारा

ठाणे : यशोधननगर येथील रहिवाशांना दोन वेगवेगळ्या वीजमीटरवरील ग्राहक क्रमांक एकच देऊन एकाला सरासरीपेक्षा अधिक, तर दुसऱ्याला कमी बिल देणाºया महावितरणच्या भोंगळ कारभाराने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या शनिवारपर्यंत सोडवण्यात येईल, असे आश्वासन महावितरणने दिले होते. परंतु, अद्याप ती सोडविली नसल्याने महावितरणला मनसे स्टाइलने धडा शिकवण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

पंचशील अपार्टमेंट, यशोधननगर येथील वीजग्राहक संजय पाटील व दीपाली परब या दोन वेगवेगळ्या वीजग्राहकांच्या विद्युतमीटरवर ग्राहक क्रमांक एकच असून, पाटील यांच्या वीजदेयकावर वीजवाचन (रीडिंग) उपलब्ध नाही, असे येत आहे, तर परब यांना एका महिन्यात ७०० ते ८०० युनिटचे रीडिंग यायला लागले आहे. पाटील यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहणाºया गणेश सुतार यांना शेवटचे बिल ३३० रुपये, तर परब यांना ३२ हजार रुपये आल्याने दोन्ही ग्राहकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या. वीजबिल कमी येत असल्याने सुतार हे गेल्या १० महिन्यांपासून महावितरणकडे खेपा घालत आहेत. त्यांना महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उद्धट वागणूक देत असल्याने त्यांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी ही बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर ग्राहकांची समस्या तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले. अद्याप ही समस्या दूर न झाल्याने महावितरणच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला.या दोन्ही ग्राहकांचे मीटर बदलले आहेत. परंतु, वाढीव बिल हे ग्राहकांना भरावेच लागेल. यात महावितरणची चूक नाही.- नारायण सोनावळे, कार्यकारी अभियंता

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका